नवी दिल्ली | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (१६ मे) दिल्लीत स्थलांतरित मजुरांशी संवाद साधला. सुखदेव विहार उड्डाणपुलाजवळ फूटपाथवर बसलेल्या मजुरांशी राहुल गांधींनी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यात राहुल गांधींनी केंद्र सरकारने आर्थिक पॅकेजमध्ये दुरुस्ती करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Delhi: Congress leader Rahul Gandhi today interacted with migrant labourers who were walking on Sukhdev Vihar flyover to return to their home states. pic.twitter.com/IgU3k474tn
— ANI (@ANI) May 16, 2020
देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, लॉकडाऊनदरम्यान, देशभरातील विवध राज्यातील हजारो स्थलांतरित मंजुरांचे तांडेच्या तांडे पायी चालत त्यांच्या राज्यात परतण्यासाठी निघातले. मात्र, यावेळी अनेक मंजुरांचे प्रवासादरम्यान मृत्यू झाल्याच घटना घडल्या आहे. यामुळे सध्या देशात स्थलांतरित मंजुरांचा सर्वात मोठी समस्या सरकारपुढे उभी आहे. स्थलांतरित मंजुरांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राहुल गांधी त्यांच्या त्यांची भेट घेऊन त्यांच्या संवाध साधला.
यावेळी राहुल गांधींनी केंद्र सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे एकप्रकारचे कर्ज आहे. सरकारने शेतकरी आणि मजुरांच्या खिशात डायरेक्ट पैसे जमा केले पाहिजेत. सरकारने कर्ज देऊ नये. सावकाराचे काम करू नये. मजुरांना कर्जाची नव्हे, तर पैशाची गरज आहे. जे त्यांच्या खिशात डायरेक्ट जमा करावेत. रस्ते अपघातांत मजूरांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे मनाला यातना होत आहे. लॉकडाऊन उठवण्याचा विचार अभ्यासपूर्ण करावा लागणार आहे. हा एक इव्हेंट नाहीये. आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं आपल्याला रक्षण करायचे आहे, आदी मुद्दे त्यांनी पत्रकार परिषदेत मांडले.
संबंधित बातम्या
केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळालीच पाहिजे | राहुल गांधी
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.