नवी दिल्ली | देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता राजधानी दिल्लीतून काहीशी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना आयसीयू (ICU) विभागात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी (१७ जून) सत्येंद्र जैन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना दिल्लीतील दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशलिस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आता फुफ्फुसात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सत्येंद्र जैन यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीत सत्येंद्र जैन यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाच्या कार्यालयाने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.
Delhi Health Minister Satyendar Jain, who has tested positive for COVID19, put on oxygen support after his lung infection increases: Office of Delhi Health Minister
(file pic) pic.twitter.com/RLnOeky0W4— ANI (@ANI) June 19, 2020
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यानंतर खरंतर दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी टेस्ट केली होती. मात्र, त्यांची ती पहिली कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र, १५ जूनला सत्येंद्र जैन यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्याचप्रमाणे, त्यांचा तापही वाढू लागला म्हणून त्यांनी पुन्हा एक कोरोना टेस्ट केली. १७ जून रोजी त्यांच्या या दुसऱ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु झाले. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या वक्तींची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन सांगण्यात आले. या काळात दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी विविध बैठकांना हजेरी लावली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.