HW News Marathi
देश / विदेश

“गुजरातमध्ये ‘आप’चे सरकार येणार”, केजरीवालांची भविष्यवाणी

मुंबई | “मी तुम्हा सर्वांसमोर लिखित स्वरुपात एक भाकीत करत आहे की, गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन होणार आहे”, अशी भविष्यवाणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. केजरीवाल यांनी रविवारी (27 नोव्हेंबर) सुरतमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपले म्हणणे कागदावर लिहून दिले. यावेळी केजरीवालांनी गुजरातमध्ये आपची सत्ता आल्यावर 31 जानेवारीपर्यंत राज्यात जुन्या निवृत्तिवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देत त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे.

केजरीवला पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, “गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर आपचे सरकार स्थापन करेल, हे भाकीत मी तुम्हाला लिहून देते. गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षाच्या चुकीच्या कारभारानंतर गुजरातचे नागरिकांना भाजपपासून सुटका होईल, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. यानंतर केजरीवाल यांनी लिहिलेले भाकीत असलेला कागद पत्रकारांना दिला.  केजरीवाल पुढे म्हणाले, “गुजरात सरकारने १ एप्रिल २००५ पासून सेवेत रुजू झालेल्या कर्मचार्‍यांसाठी नवीन अंशदायी पेन्शन योजना (NPS) सुरू केली होती. गुजरातमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर 31 जानेवारीपर्यंत सरकारी कर्माचाऱ्यांसाठी जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्यासह अन्य मागण्याही पूर्ण करू.  आप फक्त बोलून दाखव नाही. आपने पंजाबमध्ये करून दाखविले आहे. यामुळे गुजरात आपला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. या पत्रकार परिषदेदरम्यान केजरीवाल म्हणाले, ” तर याचा लाभ नवीन निवृत्तिवेतन योजना एप्रिल २००५ पूर्वी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नसेल”, असेही स्पष्ट केले

 

काय म्हणाले अरविंद केजरीवाल ?

गुजरातमधील जनतेसंदर्भात बोलताना केजरीवाल म्हणाले, “गेल्या 27 वर्षात पहिल्यांदाच भाजप गुजरात विधानसभा निवडणुकीत इतका वैतागलेला आहे. यामुळे भाजप  रस्त्यावर उतरुन लोकांना विचारत आहे की तुम्ही कोणाला मतदान करणार आहात. आणि ते आप किंवा भाजप असे लोकांना विचारत आहेत. यावेळी भाजपला मतदान करणार असे म्हणणारे लोक पाच मिनिटात आपला मतदान करणार असल्याचे स्पष्ट सांगत आहेत. देशात आम्ही अनेक राज्यात निवडणूक लढविल्या आहेत. परंतु, गुजरात हे पहिले एकमेव राज्य आहे. इथे लोक कोणाला मतदान करणार हे सांगण्यास घाबरत असल्याचे दिस आहेत. तर दुसरीकडे गुजरातमध्ये काँग्रेसचा मतदार कुठेच दिसत नाही आणि तिसरा भाजपचा समर्थक. आपला मोठ्या संख्येने मतदान करणार आहेत”,  असा दावाही केजरीवालांनी केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधींना घेतलं ताब्यात; काँग्रेसमध्ये संतापाचं वातावरण

News Desk

#MeToo : जेव्हा झालं तेव्हाच तोंड का उघडलं नाही ?

News Desk

चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणारी हॉटेल्स बंद करण्याची रामदास आठवलेंची मागणी

News Desk