HW News Marathi
देश / विदेश

नोटाबंदीबाबत मोठा खुलासा, आरबीआयने दिला होता सरकारला इशारा

नवी दिल्ली | मोदी सरकारकडून देशात ८ नोव्हे, २०१६ रोजी नोटाबंदी लागू करण्यात आली होती. यानंतर विरोधी पक्षाकडून सरकारवर मोठ्य़ा प्रमाणात टिका झाली होती. तर आता नोटाबंदीबाबत आरटीआय कार्यकर्ते असलेले व्यंकटेश नायक यांनी माहीतीच्या अधिकाराअंतर्गत अतिशय महत्वपुर्ण माहीती बाहेर काढली आहे. ज्यामध्ये आरबीआयच्या ५६१ व्या बैठकीत नोंदवण्यात आलेले निरिक्षण आहे. नोटाबंदी करण्यापुर्वी आरबीआयच्य़ा बोर्ड ऑफ डायरेक्टरची बैठक झाली होती त्या बैठकीत आरबीआयचे बोर्ड सरकारवर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीत केंद्र सरकारने आरबीआयला सांगितल्याप्रमाणे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात बाजारात चलनात आल्या आहेत या मुद्द्यावर चर्चा झाली होती.त्या बैठकीत त्यावेळचे गवर्नर उर्जित पटेल, आणि आताचे गवर्नर असलेले शक्तिकांत दास हे सुद्धा उपस्थित होते.

सराकरने सांगितल्याप्रमाणे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात बाजारात चलनात आल्या आहेत ज्यामुळे नोटाबंदी करणे आवश्यक आहे. मात्र आरबीआयच्या बोर्डातील सदस्यांनी महागाईच्या तुलनेत वाढलेल्या चलनाचं प्रमाण नगण्य आहे असं सांगितल तसेच त्यामुळे अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार नसल्याचे मतही नोंदविण्यात आले.

२०११-१२ या वर्षीच्या तुलनेत २०१५-१६ या कालावधीत अर्थव्यवस्थेमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यावेळी बाजारातील ५०० आणि १००० नोटांमध्ये ७६ टक्के १०९ टक्के एव्हढी वाढ झाली होती त्यामुळे काळा पैसा मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत फिरत होता, आणि याच कारणासाठी सरकारकडून नोटाबंदीच समर्थन करण्यात आले. बाजारात ४०० कोटींच्या नोटा असल्याचही त्यावेळी सरकारकडून सांगण्यात आलं होतं. परंतू आरबीआय बोर्डच्या सदस्यांकडून अस सांगण्यात आले की, संपुर्ण अर्थव्यवस्थेचा व्याप लक्षात घेता हा आकडा फार परिणामकारक नाही.

पुढे त्यांनी नोंदविलेल्या निरिक्षणामध्ये सांगण्यात आले की काळा पैसा हा रोख स्वरुपात न वापरता सोने आणि मालमत्तेच्या रुपात गुंतवणूक केली जाते. त्यामुळे नोटबंदीमुळे काळ्या पैशाला आळा बसण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतील असं मतं बैठकीत मांडण्यात आले होते.

तसेच आपल्या एका मुद्यात ते सांगत आहे की, पर्य़टन क्षेत्राला या नोटाबंदीचा मोठा फटका बसु शकतो, कारण बाहेर असणाऱ्यांना हमाल, टॅक्सी ड्रायव्हर यांना पैसे द्यावे लागतील त्यावेळी नोटाबंदी असल्य़ास त्यांना मोठया अडचणीचा सामना करावा लागेल.

उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आरबीआयच्या बोर्डाची ही नोटाबंदी लागू होण्याच्या काही तास आधी ही बैठक पार पाडली. या बैठकीत आरबीआयचे विद्यमान गर्व्हनर शक्तिकांत दास, आर गांधी, एसएस मुंदडा सुद्धा सहभागी होते

नोटबंदीचे समर्थन करत केंद्र सरकारने नोटबंदीमुळे काळा पैशाला आळा बसला, दहशतवाद रोखण्यासाठी नोटबंदीचा फायदा झाला असल्याचा दावा केला. तर आता हा रिपोर्ट आल्यानंतर विऱोधी पक्षाला सरकारला घेरण्याची अजुन एक संधी मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातून कांदा निर्यातबंदीचे पडसाद उमटू लागल्यानंतर फडणवीसांचे गोयल यांना पत्र

News Desk

गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ अण्णा हजारेच्या भेटीला

News Desk

५ एकर जमिनीची भीक नको | असदुद्दीन ओवेसी

News Desk