HW Marathi
देश / विदेश

अवनीला ठार मारायचे नव्हते…पण परिस्थिती तशी होती !

यवतमाळ। “अवनी वाघिणीला आम्हाला ठार मारायचे नव्हते. पण जेव्हा वन खात्याच्या अधिकाऱ्याने तिच्यावर ट्रँक्विलाइज़र डार्टने निशाणा साधला. त्यावेळी ती उत्तेजित झाली आणि आमच्या वाहनाकडे झेपावली. त्यावेळी मी स्वसंरक्षणार्थ तिच्यावर गोळी झाडली”, असा खुलासा नवाब अजगर अलीने केला आहे. नरभक्षक वाघीण अवनी हिची वन खात्याकडून हत्त्या करण्यात आली आहे. अवनीच्या या शिकारीमुळे वन खात्यावर सर्व स्तरावरून टीका झाल्या. नरभक्षक अवनी वाघिणीने रावेलमधल्या १४ जणांचा जीव घेतला होता. “अवनी वाघिणीला ठार मारायचं नव्हत. मात्र परिस्थिती तशी होती ज्यामुळे तिला मारावं लागलं,” असे म्हटले आहे.

अवनीला का मारले याच स्पष्टीकरण मुख्य वनसंरक्षक यांनी दिले आहे. शुक्रवारी टी-1 वाघिणीचा शोध सुरू होता. त्यावेळी ती शोध पथकाला दिसली. तिला जेरबंद करण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यावेळी तिनं पथकाच्या दिशेनं चाल केली. त्यामुळे शार्प शूटर अजगर अलीने तिच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यात तिचा मृत्यू झाला. रात्री एकच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. आता वाघिणीचा मृतदेह नागपूरला पाठवण्यात आला आहे. टी-१ वाघिणीचे ११ महिन्यांचे दोन बछडे आहेत. त्यांना शोधण्याचे आव्हान आता वन विभागासमोर आहे.

Related posts

हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस, आयआयटीचे ३५ विद्यार्थ्यांसह ४५ नागरिक बेपत्ता

अपर्णा गोतपागर

Ayodhya Verdict : सर्वोच्च न्यायालयात आज ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी

News Desk

सुनेने दुधात विष मिसळलं. सासरकडील १३ जणांचा मृत्यू

News Desk