HW News Marathi
देश / विदेश

डीपीचा स्फोट, १४ व-हाडी ठार

जयपूर(वृत्तसंस्था): राजस्थानमधील जयपूर येथे लग्न मांडवाजवळ ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने १४ जणांचा मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून राजस्थानच्या उर्जा मंत्र्यांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत.

शाहपूरा येथील खातोलाई गावात मंगळवारी लग्नाची तयारी सुरू होती. गावातील मुलीचे लग्न असल्याने सर्वच मंडळी वधूच्या घरात जमली होती. लग्नमांडवात गावातील महिला गाणी गात होत्या. तर लहान मुले या गाण्यांवर नाचत होती. याच दरम्यान ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला आणि घटनास्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये लहान मुलीचा समावेश आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. जखमींवर जयपूरमधील एसएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय सैन्याचं शौर्याचं प्रतीक कारगिल युद्धाला आज 22 वर्ष पूर्ण

News Desk

“रोजगारासाठी मोदी सरकार हानिकारक”, राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

News Desk

सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे निधन

Aprna