HW News Marathi
देश / विदेश

मोदींना ‘आयुष्यमान भारत’ योजनेसाठी नोबेल द्यावा | डॉ. तमिलीसाई सुंदरराजन

बंगळुरू | जगातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोबेल पुरस्कार देण्यात यावे, यासाठी तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांनी मोदींची नावाची शिफारस केली आहे. तमिलीसाई यांनी नोबेल पुरस्कारसाठी मोदींचे मोहीम चालवण्यात आली आहे. नोबेल पुरस्कारासाठी आता पर्यंत भारतातून मदर तेरेसा आणि कैलास सत्यार्थी या शांततेचा नोबेल मिळाले आहे.

पंतप्रधान जन आरोग्य योजना अर्थात ‘आयुष्यमान भारत’ या महत्त्‍वाकांक्षी योजनेचे नुकतेच मोदींनी २३ सपेटंबरला ‘आयुष्यमान भारत’ योजनेचा शुभारंभ केला. या योजनेचा लाभ देशातील १० कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना मिळणार आहे. जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असल्याचा दावा केंद्र सरकरानी केला आहे. मोदींच्या या कार्यासाठी २०१९ सालचे शांततेचे नोबेल मिळावे, असे आवाहन तमिलीसाई याचे मत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अदर पूनावाला यांची मोठी घोषणा, म्हणाले….

Jui Jadhav

BiharElection : बिहारच्या जनतेनं मतपेटीतून कुणाला कौल दिला जाहीर होणार काही तासात

News Desk

दक्षिण कोरियाने ८०० किलोमीटरची मारक क्षमता असलेल्या मिसाइलचे केले परीक्षण…

News Desk
देश / विदेश

देशातील इंधन दरवाढ कायम, सामान्यांमध्ये संताप

Gauri Tilekar

मुंबई | मुंबईत आधीच पेट्रोलच्या किंमतींनी नव्वदी ओलांडली आहे. मुंबईत आज पेट्रोलच्या दरात १४ पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलची प्रतिलिटर किंमत तब्बल ९०.२२ रुपये एवढी झाली आहे. त्याचप्रमाणे डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. मुंबईत डिझेल ११ पैशांची महागले आहे. आता डिझेलची प्रतिलिटर किंमत ७८.६९ एवढी झाली आहे.

मुंबईसह राजधानी दिल्लीतही पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. दिल्ली पेट्रोलच्या दरात १४ पैशांची वाढ झाल्याने प्रतिलिटर पेट्रोल ८२.८६ रुपयांवर तर प्रतिलिटर डिझेल ७४.१२ रुपयांवर पोहोचले आहे. डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने माल वाहतुकीच्या खर्चात वाढ झाली आहे. देशातील वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आणि इतर २१ पक्षांनी केलेल्या ‘भारत बंद’चा इंधन दरवाढीवर कोणताही परिणाम झालेला नाही.

गेल्या काही दिवसांच्या वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात होणारे रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलाचे भाव प्रचंड प्रमाणात भडकल्याने, मोठ्या प्रमाणात इंधनावर लावला गेलेला अधिभारामुळे देशातील इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशातील महागाईमुळे सामान्यांना होणाऱ्या त्रासाकडे सरकार सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे.

Related posts

मी भाजपमध्ये जाणार नाही, पायलट निर्णयावर ठाम !

News Desk

जम्मूमधील बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला

News Desk

धनुष्यबाणावर निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाचा जोरदार युक्तीवाद

Aprna