HW Marathi
देश / विदेश

दिवाळी बोनस न दिल्यामुळे एअर इंडियाचे कर्मचारी संपावर

मुंबई | एअर इंडियाचे तब्बल ४०० कर्मचारी बुधवारी (८ नोव्हेंबर) रात्रीपासून संपावर गेले आहेत. दिवाळीचा बोनस न दिल्याने ग्राऊंड स्टाफ व कमर्शियल विभागातील संपाचे हत्यार उपसले आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या अचानक पुकारलेल्या या संपामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवाळीत बोनस न मिळाल्यामुळे त्यांनी संप केला आहे. हे सर्व कर्मचारी एअर इंंडियाशी संलग्न असलेल्या एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस ( एआयएटीएस)  मध्ये हे कर्मचारी काम करत आहेत.

एअर इंडिया त्यांच्या कर्मचाऱ्यांना किरकोळ कारणावरून निलंबन करणे, मुलभूत सुविधा नाकारणे, कामगार संघटनानांवर अन्यायकारक अटी लादणे आणि बोनस न देणे अशा विविध कारणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण तयार होत होते. या संपातून त्यांच्यामधील रागाच स्फोट झालेला दिसून येत आहे.

विमानसेवेवर आणखी कोणताही प्रतिकूल परिणाम होऊ नये प्रयत्न सुरु एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपामुळे प्रवाशांना चेक इनसाठी लांब रांगा लागल्या असून अनेक विमानांचे उड्डाणदेखील उशिराने होत आहे. चेक इन, सामान विमानात ठेवणे, स्वच्छता राखणे, कार्गो इत्यादी गोष्टींची जबाबदारी ग्राऊंड स्टाफकडे असते. पण त्यांनी आक्रमक होत संप पुकारल्याने या सर्व गोष्टींचा खोळंबा झाला असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्ता त्यांनी सांगितली आहे.

 

Related posts

पर्रिकरांची सुरक्षा वाढावा गोवा काँग्रेसच राष्ट्रपतींना पत्र

News Desk

दिल्ली उच्च न्यायालयाने सज्जन कुमारची याचिका फेटाळली

News Desk

माओवाद्यांच्या निशाण्यावर नरेंद्र मोदी

News Desk