लखनऊ | “अयोध्या हमारी आन बान और शान है |अयोद्धा कि पहचान प्रभू श्रीराम कि वजह से ही है |”असे म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘आजपासून फैजाबादचे नाव बदलून अयोध्या होईल’ अशी घोषणा त्यांनी केली आहे. अयोध्यामध्ये दीपोत्सव कार्यक्रमाच्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी बोलताना म्हटले आहे.
Ayodhya hamari aan baan shaan ka prateek hai, Ayodhya ki pehchan Bhagwan Ram se hai. Aaj se is janpad(Faizabad) ka naam bhi Ayodhya hoga: UP CM Yogi Adityanath #Diwali pic.twitter.com/PNTSOHvM2v
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 6, 2018

अयोध्यामध्ये यंदाची दिवाळी ही खूप खास आहे. दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दक्षिण कोरियाची फर्स्ट लेडी किम जोंग सूक अयोध्यामध्ये पोहचल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रभू रामचंद्रांच्या पुतळ्यासंदर्भात आज घोषणा करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
South Korean first lady Kim-Jung Sook arrives at Queen Hau Park in Ayodhya #Diwali pic.twitter.com/MvelaHJian
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 6, 2018
CM Yogi Adityanath and South Korean first lady Kim-Jung Sook inaugurate the Queen Huh Memorial at Queen Huh Park in Ayodhya. pic.twitter.com/qbDnQQeGZW
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 6, 2018
शरयू नदीच्या तीरावर प्रभू रामचंद्रांचा १५१ मीटर उंचीचा पुतळा उभारण्याची घोषणा आज संध्याकाळी योगी करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अयोध्या महापालिकेचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांनी सांगितले की, अयोध्येमध्ये शरयूतीरावर प्रभू रामचंद्रांचा १५१ मीटर उंचीचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव आहे. योगी आदित्यनाथ यासंदर्भातील घोषणा आज करतील अशी अपेक्षा असल्याचेही उपाध्याय म्हणाले.
योगी सरकार यंदाची ही देशातील सर्वात मोठी दिवाळी साजरा करणार असून या दिवाळीत ३ लाख दिव्यांच्या रोषणाईने नाहून निघणार आहे. ऐवढच नव्हे तर लेजर शोमाध्यमातून रामकथा दाखविण्यात येणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.