HW News Marathi
देश / विदेश

कार्ती चिदंबरम यांच्या ५४ कोटींची मालमत्तेवर ईडीची जप्ती

नवी दिल्ली | माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पूत्र कार्ती चिदंबरम याची आएनएक्स मीडिया प्रकरणी ५४ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) जप्त करण्यात आली आहे. कार्तीच्या इंग्लंड,स्पेन आणि ऊटीतील येथील बंगल्यांनाही जप्ती आणली आहे. यांसह कार्ती याचे चेन्नईच्या बँकेतील ९० लाखांचे फिक्स्ड डिपॉझिट, दिल्लीच्या जोरबाघ परिसरातील मालमत्ता यांवरही ईडीने जप्ती आणली आहे. मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून जप्त करण्यात आलेली तब्बल ५४ कोटींची मालमत्ता कार्ती आणि एएससीपीएल कंपनीच्या नावावर आहे.

सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरप्रमाणे ईडीने मनी लॉन्ड्रींग कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार ४.६२ कोटींऐवजी ३०५ कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक आयएनएक्स मीडियात करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी कार्ती चिदंबरंची कंपनी आयएनक्स मीडिया हाऊसला अनधिकृतरित्या पैसा मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने केलेल्या तपासानंतर कार्ती यांच्या अनेक अनधिकृत व्यवहारांची माहिती उघड झाली आहे. सीबीआयने कार्तीविरूद्ध एफआयआर देखील दाखल केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अखिलेश, लालूप्रसादसह चिराग पासवान यांची सुरक्षा काढली

News Desk

स्वाती महाडिक आज सैन्यात रुजू होणार

News Desk

Assembly Elections 2022 VotingLive Updates : सकाळी ९ वाजेपर्यंत यूपीमध्ये ९.४५ टक्के, उत्तराखंडमध्ये ५.१५ टक्के अन् गोव्यात ११.०४ टक्के मतदान

Aprna
मनोरंजन

बिग बींना ७६व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा….

Gauri Tilekar

मुंबई | बिग बी म्हणून ओळखले जाणारे एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आज ७६ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा महानायक मानले जाते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी तसेच कलाविश्वातील अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रणबीर कपूर, रजनीकांत, विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडूलकर या दिग्गजांनीदेखील बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत.

बिग बींनी आपल्या चाहत्यांसाठी ट्विट करून आभार व्यक्त केले आहेत. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जातात. कारण कुठलीही भूमिका साकारणे त्यांच्यासाठी अवघड नाही. अगदी बेमालूमपणे ते कुठल्याही भूमिकेत शिरतात आणि ती भूमिका अक्षरश: जिवंत करतात. भारतीय चित्रपटातील ‘अॅग्री यंग मॅन’ अशी ओळख मिळविलेल्या अमिताभ बच्चन यांनी १९७० मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. अमिताभ बच्‍चन यांचा दमदार आवाज आणि डायलॉग्‍जने तमाम सिनेसृष्‍टीला भुरळ घातली आहे. या वयातही अमिताभ तरुण आणि स्टार अभिनेत्यांना लाजवतील अशा उत्साहाने काम करीत आहेत. तसेच कित्‍येक वर्षे लोटली तरी चित्रपटांतील त्‍यांचे कित्‍येक संवाद चाहत्‍यांच्‍या मनात आजही घर करून आहेत.

Related posts

रणवीर सिंह यांच्या न्यूड फोटोशूटमुळे पोलिसांत गुन्हा दाखल

Aprna

स्टार प्रवाहवरील ‘राजा शिवछत्रपती’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

swarit

कपिल खोटं बोलतोय..

News Desk