HW News Marathi
देश / विदेश

थायलंडच्या गुहेतून आतापर्यंत ११ मुले बाहेर

माए साई | थायलंडच्या गुहेत चार मुलांना बाहेर काढण्यात नौदल कर्मचारी व स्कूबा डायव्हर्स यांना यश आले आहे. आता केवळ चार मुले आणि त्यांचा प्रशिक्षक गुहेत अडकलेल आहेत. या गुहेत १२ मुले आणि त्यांचे प्रशिक्षक गुहेत अडकले होते. मंगळवारी या गुहेतून ११ मुलांना बाहेर काढण्यात आली आहे. आता या गुहेत फक्त २ जण अडकले असून त्यांना देखील लवकरच बाहेर काढले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या मुलांना बाहेर काढताना काही अडचणीमुळे हे रेस्क्यु मिशन लांबले होते.

हे मिशन सुरू झाल्यानंतर एका मुलाला बाहेर काढण्यात यश आले होते. या गुहेतून बाहेर काढण्यात आलेल्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करूनच त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे. गेल्या २ आठवड्यापासून ही मुले गुहेत अडकली आहेत.

मुले गुहेत कशी अडकली

थायलंडमधील एका शाळेतील १२ मुले फुटबॉल खेळल्यानंतर आपल्या कोचबरोबर २३ जूनला ‘टॅम लूंग’ ही गुहा पाहण्यासाठी गेले होते. परंतु गुहेत पुराचे पाणी आल्याने ही सर्व मुले तिथेच अडकून पडली. त्यानंतर नॅशनल पार्कच्या कर्मचाऱ्यांना गुहे बाहेर सायकल आणि खेळाचे काही साहित्य दिसले. याबाबत कर्मचाऱ्यांनी स्थानिक फुटबॉल क्लबशी संपर्क साधल्यानंतर १२ लहामुले आणि त्यांचा प्रशिक्षक गुहेत अडकले असल्याचे समोर आले.

ही सर्व मुले ११ ते १६ वर्ष या वयोगटातील आहेत. या मुलांचा प्रशिक्षकचे वय २५ वर्ष आहे. पूर परिस्थिती लक्षात घेऊन थायलंड प्रशासनाने मुलांना वाजविण्यासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केली आहे. या गुहेची लांबी १०,३१६ मीटर एवढी असल्याची माहिती मिळाली आहे. ही मुले या गुहेच्या चार किलोमीटर आत अडकली आहेत. थायलंड प्रशासनाने मुलांना शोधून त्यांना अन्न, पाणी, औषधे आणि ऑक्सिजन या महत्त्वाच्या गोष्टी पुरवित आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारच्या पहिल्या ‘कोरोना पॅकेज’चे स्वागत, संकटाचे वळण लक्षात वेळोवेळी नवे ‘पॅकेज’ हवे !

swarit

फेसबुक लाइव्हवर दाखवला सामूहिक बलात्कार

News Desk

संसद कायदा करून राम मंदिर बनवू शकते | जस्टिस चेलमेश्वर

News Desk