HW Marathi
देश / विदेश

लोकसभेचे वेळापत्रक आज सायंकाळी जाहीर होणार  

मुंबई |  निवडणूक आयोगाची आज (१० मार्च) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत २०१९च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. यानंतर संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू होण्याची शक्याता आहे. देशभरातील २९ राज्यात ६ ते ७ टप्प्यात निवडणुका होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याबरबोर निवडणुकीचे निकाल कधी लागणार या तारखांकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेत एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. यानतंर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र लोकसभा निवडणुका वेळेवरच होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी सांगितले होते.

 

 

 

Related posts

आधार’ सर्वोच्च न्यायालयाकडून ‘निराधार’

News Desk

…अशीच मदत किंगफिशर एअरलाईन्सला का केली नाही ?

News Desk

ऑस्करमध्ये पहिल्यांदाच बॉलिवूड कलाकारांना श्रद्धांजली

News Desk