HW News Marathi
देश / विदेश

कर्नाटकमध्ये निवडणुकांचे बिगूल वाजले!

बेंगळुरू | कर्नाटक राज्याच्या विधानसभेसाठी मतदानाची तारीख जाहीर झाली आहे. संपूर्ण कर्नाटक विधानसभेसाठी एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 12 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.

  • असा असेल निवडणूक कार्यक्रम

17 एप्रिल – अधिसूचना जारी

24 एप्रिल – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

25 एप्रिल – उमेदवारी अर्जांची छाननी

27 एप्रिल – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख

12 मे – मतदान

15 मे – मतमोजणी

दरम्यान, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू असतानाच भाजपचे आयटी सेलप्रमुख अमित मालवीय यांनी ट्वीटरवर तारखा जाहीर केल्या. त्यासंदर्भात काही माध्यमांनी बातम्याही दिल्या. मालवीय यांचे ट्वीटही लगेच व्हायरल झाले. मात्र त्यांच्या अकाऊंटवर पाहिले असता हे ट्वीट दिसले नाही. त्यामुळे त्यांनी हे ट्वीट डिलीट केल्याची शक्यता आहे. तर निवडणूक आयोगाने याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

विधानसभेच्या 224 जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. सध्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. सिद्धरमैय्या मुख्यमंत्री आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आधार’चा डेटा हॅक

News Desk

किम जोंग उन यांनी सेनाधिकाऱ्यावर ९० गोळ्या झाडल्या

News Desk

उद्धव ठाकरे काही बॉलिवूड माफियांच्या दबावात, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

News Desk
मुंबई

डबेवाल्यांमध्ये प्रसिद्धीसाठी चढाओढ

News Desk

मुंबई | सव्वाशे वर्षांहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या मुंबईतील डब्बेवाल्यांच्या संघटनेत फूट पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या विरोधात काही डबेवालेच पुढे आले असून त्यांनी ही फूट पाडणाऱ्यांविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. डबेवाल्यांचे प्रवक्ते म्हणून मिरवणारे सुभाष तळेकर यांनी हे फुट पाडण्याचे काम सुरू केले असून डबेवाल्यांच्या नावे त्यांनी लाखो रुपये लाटल्याचा आरोपही डबेवाल्यांनी तळेकरांवर केला आहे.

मुंबईत डबे पोहचवण्याचे काम करणाऱ्या या डब्बेवाल्यांना तब्बल १२९ वर्षांची परंपरा आहे. मागील १२९ वर्ष डबेवाले मुंबईकरांची सेवा करतायत. त्याचबरोबर डब्बेवाल्यांची ऐकीही मागील १२९ वर्ष टिकून आहे. ‘मॅनेजमेंट गुरू’ अशी ओळख असणारे मुंबईचे डबेवाले आता टेक्नोसॅव्ही झाले असून त्यांनी आता ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. त्याच बरोबर ते कुरियर सेवा देखील देणार आहे.

पण, सुभाष तळेकर यांना मुंबई डबेवाल्यांचे प्रवक्ते या पदावरुन दूर करण्यात आले असून फसवणूकीप्रकरणी तळेकर यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. बडतर्फ करण्यात आले असतानाही तळेकर डबेवाल्यांच्या नावाने वेगवेगळे कार्यक्रम व खोट्या बातम्या पसरवून डबेवाला मंडळाची फसवणूक करत आहेत. मंडळाचे सचिव असल्याचे भासवून मंडळाचे अध्यक्ष व इतर कार्यकारणी सदस्यांची परवानगी न घेता डबेवाल्यांच्या नावाचा गैरवापर करीत आहेत. बातम्यांमार्फत स्वतःची प्रसिद्धी करीत आहेत. डबेवाल्यांच्या नावाचा गैरवापर करुन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी व प्रसिद्धीसाठी खोट्या बातम्या देऊन संघटनेची फसवणूक करत आहेत, असे आरोप तळेकर यांच्यावर करण्यात आले.

ज्या डबेवाल्यांच्या मॅनेजमेंटचे कौतुक जगभर होते, त्याच डबेवाल्यांमध्ये सुरू असलेल्या या सर्व प्रकरणाची डबेवाल्यांनी मुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षाचे प्रमुख नेते, पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच सुभाष तळेकर यांच्याकड़ून येणाऱ्या बातम्यांची दखल माध्यमांनी घेऊ नये असे आवाहनही या डबेवाल्यांनी केले आहे. डबेवाल्यांमध्ये पडलेली ही फुट मिटवण्यासाठी अंतर्गत समझोता करण्याचाही काही डबेवाले प्रयत्न करत आहेत.

तळेकरांवर काय आहेत नेमके आरोप –

– डबेवाल्यांच्या संस्थेच्या घटनेत प्रवक्तेपदाची तरतुदच नाही

– सुभाष तळेकर यांनी बेकायदेशीरपणे स्वतःला प्रवक्ते केले

– काही डबेवाल्यांना हाताशी धरून त्यांनी ही बेकायदेशीरबाब केली आहे

– स्वतः सुभाष तळेकर यांनी कधीच डबे वाहिले नाहीत

– तळेकरांनी डबेवाल्यांची बेकायदशीररित्या बेवसाईट सुरू केली

– या वेबसाईटवर संस्थेचा पत्ता आणि नंबर न देता स्वतःचा घरचा पत्ता आणि नंबर दिले

– संस्थेचे लटरहेड छापून त्यावरही घरचा पत्ता आणि स्वतःचे नंबर दिले

– डबेवाल्यांच्या नावावर मॅनेजमेंटची व्याख्याने दिली

– त्यातून येणारे पैसे स्वतः लाटले, संस्थेला एकही पैसा दिला नाही

– डब्यांवरील जाहीरातीचे पैसेही तळेकरांनी लाटले

Related posts

पुण्यात २१ कुत्र्यांचे हत्याकांड

News Desk

प्रभाग क्रमांक 56 मध्ये महिला पत्रकार दीप्ती यांना मतदारांचा भरघोस पाठिंबा

News Desk

भांडारकर संस्थेत तोडफोड करणारे संभाजी ब्रिगेडचे ६८ जण निर्दोष

News Desk