HW Marathi
देश / विदेश

चाक नादुरुस्त असल्याचे लक्षात येऊनही एक्स्प्रेस तब्बल २०० किमी चालवली

जमशेदपूर | मुंबई सीएसएमटीहून हावडाला जाणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या थर्ड एसी डब्याची चाक नादुरुस्त झाल्याचे कळून देखील रेल्वे अधिकाऱ्यांनी ही एक्स्प्रेस तब्बल २०० किमी चालविली असून या प्रकारातून रेल्वे अधिकाऱ्यांचा बेफिकीरपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

सीएसएमटीहून सुटल्यानंतर एक्स्प्रेस ज्या अपेक्षित वेळेत पोहोचायला हवी होती त्यापेक्षा तब्बल दहा तास उशिरा पोहोचली. ही ट्रेन महालीमुरुम स्टेशनवरून गेल्यानंतर काहीतरी बिघाड झाल्याची माहिती चक्रधरपूर येथील अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यानंतर थर्ड एसीच्या बी १ डब्ब्याच्या चाकामध्ये बिघाड झाल्याचे समजले, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या तपासणीनंतर डबा वेगळा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या सर्व प्रकारात जवळपास ४५ मिनिटे वाया गेली. यामुळे आलेल्या दबावामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी हावडा ट्रेनला नादुरुस्त अवस्थेतच हावड्याला पाठविले. ट्रेनमधील प्रवाशांना हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याला विरोध करत गडबड करायला सुरुवात केली.

Related posts

एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ

News Desk

आमदार आणि सनदी अधिकाऱ्याची लव्ह स्टोरी   

News Desk

21 नावाने दाऊदचा जगभर वावर

News Desk