HW News Marathi
देश / विदेश

फेसबुक ‘हे’ फिचर लॉंच करणार नाही

नवी दिल्ली | फेसबुकच्या माध्यमातून आपले विचार आणि मत मांडणाऱ्या लोकांसाठी फेसबुककडून कॉमन ग्राऊंड हे फिचर लाँच करण्यात येणार होते. मात्र, केंब्रिज ॲनॅलिटीका प्रकरणानंतर फेसबुकने हे नवे फिचर लॉंच करण्याचा विचार सोडून दिला असल्याची माहिती मिळत आहे. फेसबुकचे ग्लोबल पॉलिसी प्रमुख जिओल कप्लान यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर “फेसबुकवर पक्षपात केल्याच्या आरोप होऊ नये”, या हेतूने ‘कॉमन ग्राऊंड’ हे फिचर लॉंच करणे टाळले आहे.

फेसबुक हे विविध विषयांवर आपले मत व्यक्त करण्यासाठीचे एक उत्तम व्यासपीठ मानले जाते. म्हणूनच जगभरातील असंख्य लोक फेसबुकच्या माध्यमातून विविध देशांतील अनेक विषयांबाबत आपले मत व्यक्त करीत असतात. मात्र, गेल्या काही काळात फेसबुकचा वापर हा राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. केंब्रिज ॲनॅलिटीका प्रकरणामुळे फेसबुकने राजकीय चर्चा करण्यासंदर्भातील नवे फिचर लाँच करणे टाळले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्नीवर 30 वेळा चाकूने वार करून खून, आरोपी पती अटक

News Desk

अमेरिकेच्या मदतीने दिल्लीतून दहशतवादी अटकेत

News Desk

राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे लोकसभेत गदारोळ

News Desk