HW Marathi
देश / विदेश

‘फनी’ चक्रीवादळ ओडिसा किनारपट्टीवर धडकले, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

नवी दिल्ली | बंगाल उपसागरात उसळलेले ‘फनी’ चक्रीवादळ शुक्रवार (३ मे) ओडिसा किनारपट्टीवर धडकले आहे. या पार्श्वभूमीवर पुरी, भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. हे चक्रीवादळ १७५ किलोमीटर प्रतितास इतक्या प्रचंड वाऱ्याच्या वेगासह ओडिसा किनारपट्टीवर धडकले आहे. दरम्यान, सकाळी ११ नंतर या चक्रीवादळाचा वेग कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या २० वर्षांतील आतापर्यंतचे सर्वात भयंकर चक्रीवादळ ठरू शकते 

जेडब्ल्यूटीसीनुसार, ‘फनी’ हे गेल्या २० वर्षांतील आतापर्यंतचे सर्वात भयंकर चक्रीवादळ ठरू शकते. १९९९ साली ओडिसामध्ये आलेल्या सुपर सायक्लॉनमध्ये जवळपास १० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार गेल्या ४३ वर्षांमध्ये एप्रिल महिन्यात भारताच्या जवळपासच्या समुद्री पट्ट्यात असे चक्रीवादळ येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Related posts

आलोक वर्मांच्या घराबाहेरून ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे आयबीचे ओळखपत्र ?

Gauri Tilekar

Economic Survey 2020| आर्थिक सर्वे म्हणजे काय ? तो बजेटच्या एक दिवस आधी का मांडला जातो …

Arati More

भारताची कारवाई पाकिस्तानच्या जिव्हारी, संसदेत दिले ‘इम्रान खान मुर्दाबाद’चे नारे

News Desk