HW Marathi
देश / विदेश राजकारण

शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण न केल्याने शेतकऱ्यांचा मोदी सरकारला आंदोलनाचा इशारा 

नवी दिल्ली | १४ सप्टेंबरपासून पावसाळी आधिवेशनाला सुरुवात झाली आहे. देशात शेतकऱ्यांचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. अशात आज(१६ सप्टेंबर) शेतकऱ्यांशी संबंधित तीन अध्यादेशांवरुन शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकरी संसदेच्या बाहेर केंद्रीतील मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा विरोध करण्यासाठी आंदोलन करणार आहे. भारतीय किसान यूनियनशी संबंधित शेतकरी संसदेबाहेर आंदोलन करणार असून या आंदोलनामध्ये हिरयाणा, तेलंगना, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शेतकरी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही माहिती भारतीय किसान यूनियनचे नेते गुरनाम सिंह यांनी दिल्याचे ‘न्यूज १८ हिंदी’ने सांगितले आहे.

हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शेतकरी शेती संदर्भातील तीन अध्यादेशांचा विरोध करण्यासाठी आज संसदेबाहेर धरणं आंदोलन करणार आहेत. याचबरोबरच पंजाबमधील भाजपाचा मित्र पक्ष असणाऱ्यि शिरोमणि अकाली दलही या अध्यादेशांवर नाराज असल्याचे दिसत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिरोमणि अकाली दल या अध्यादेशांच्या विरोधात मतदान करणार आहे.

कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रामध्येही अनेक ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर सध्या बंदरांवर असलेल्या ७१२ कंटेनर कांद्याचे काय होणार यासंदर्भात संभ्रम कायम आहे. या कंटेनर्समध्ये एक किलोपासून ५० किलोपर्यंत वेगवगेळ्या प्रकारचे कांद्याचे पॅकिंग आहेत. आता निर्यातीसाठी कंटेनरमध्ये भरुन तयार असणाऱ्या कांद्याचे काय होणार असा प्रश्न निर्यातदारांना पडला आहे. एका कंटेनरची किंमत ८ ते १० लाखांदरम्यान आहे.

Related posts

मराठा आरक्षणावर पुढची सुनावणी २७ जुलैला,सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष!

News Desk

मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे ‘कोरोना रुग्णालया’त रुपांतर !

News Desk

धनंजय… या खड्ड्यांचा सेल्फी काढून तूच त्या चंद्रकांतदादा पाटलांना पाठव रे बाबा

Ramdas Pandewad