HW News Marathi
देश / विदेश

आधी महाराष्ट्राचा अपमान आता मोदींकडून शरद पवारांचं कौतुक

नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भर राज्यसभेत काँग्रेसवर ताशेरे ओढले आहेत. राज्यसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली आहे. मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं मोदींनी तोंडभरून कौतुक केलं आहे. काँग्रेसने देशाचा विकास होऊ दिला नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. तर शरद पवारांसारखं नेतृत्व असावं असं म्हणत पवारांचं कौतुक केलं आहे.

नरेंद्र मोदींनी काल लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर आज पुन्हा राज्यसभेत बोलतानाही त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. मोदींनी राहुल गांधींचं नाव न घेता टीका केली आहे. तसेच त्यांना शरद पवारांकडून शिकण्याची गरज असल्याचेही मोदी म्हणाले. मोदींनी सभागृहात सरकारने बोलावलेल्या बैठकीचा संदर्भ दिला, ज्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे नेते उपस्थित होते. मात्र, काँग्रेसने या सभेपासून दूर राहून या बैठकीला हजेरी लावली नाही. यावर मोदी म्हणाले की, कोरोनाचा धोका संपूर्ण मानवजातीवर आहे, पण तुम्हाला त्याचे गांभीर्य समजले नाही. शरद पवारांच्याकडून काही तरी धडा घ्या. आजारी असूनही ते मतदारसंघातील लोकांना प्रोत्साहित करत आहेत. मग तुम्हाला एवढं नैराश्य का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

पुढे मोदी म्हणाले, “मी यासंदर्भात शरद पवारांचे आभार मानतो. बैठकीवर बहिष्काराचा निर्णय यूपीएचा नाही, असंही त्यांनी म्हटलं. शिवाय, जास्तीत जास्त पक्षांशी बोलून त्यांना बैठकीला बोलावेन, असं ते म्हणाले होते आणि टीएमसीसह ते इतर पक्षांना घेऊन आलेही.” मोदी म्हणाले की कोरोनावर सर्वपक्षीय बैठक झाली आणि सरकारला सविस्तर सादरीकरण करायचे असताना काही राजकीय पक्षांनी त्यात सहभागी होऊ नये म्हणून इतरांची मनं वळवण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी स्वतः न येता बैठकीवर बहिष्कार टाकला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आई मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, कदाचित या हल्ल्यात मी बचवणार नाही !

Gauri Tilekar

कृषी विधेयकांचे कायद्यात रूपांतर, राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी!

News Desk

“तुमची गाडी पेट्रोलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते”

News Desk