HW News Marathi
देश / विदेश

अकोल्याचे पाच जण गोवा बीचवर बुडाले

पणजी | गोव्यातल्या कळंगुट बीचवर पाच जण बुडाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यापैकी तिघांचे मृतदेह मिळाला असून सध्या दोघांचा शोध सुरु आहे. बुडालेले पाच जण अकोला जिल्ह्यातले असल्याची मिळाली आहे.

अकोला येथील मोठी उमरी, विठठ्ल नगरच्या १४ जणांचा ग्रुप गोव्यामध्ये रेल्वेने सोमवारी सकाळी साडे-चार वाजता गोव्यात आला होता. सकाळी मडगाव रेल्वे स्टेशनवरुन ते टॅक्सीने कळंगुट बीचवर पोहचले. अंघोळीसाठी गेले असता पाज जण बुडाल्याची घटना घडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अमेरिकेत पावसाचा कहर, भारतीय विद्यार्थी अडकले

News Desk

… म्हणून चक्क दलित महिलेचे नाक कापले

News Desk

काश्मीरच्या राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाई

News Desk
राजकारण

मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या सुरक्षेत वाढ करा

News Desk

मुंबई | पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत इतर पक्षांकडून टीका होत असतानाच मित्र पक्ष शिवसेनेने मात्र भाजपा ची पाठराखण केली आहे . मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करावी अशी मागणी शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’तून केली आहे.

  • नेमक काय म्हटलय सामनात

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत कोणतेही राजकारण कोणीच करू नये. राष्ट्राचे व राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचे रक्षण व्हायलाच हवे. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे . पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांभोवती अभेद्य सुरक्षा कवच उभारणीवर जोर द्यावा लागेल. राजीव गांधी व इंदिरा गांधी यांच्या हत्येतून आपण धडा घेतला पाहिजे. हिंदुस्थानने दोन थोर नेते अशा हिंसाचारात गमावले आहेत. इंदिरा गांधींना खलिस्तानवाद्यांनी तर राजीव गांधींना ‘लिट्टे’ म्हणजे तामिळी अतिरेक्यांनी मारले.

पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी मारायचे ठरवले असल्याचे उघड झाले. मात्र या हत्या कटाचा जो उत्सव आपल्या राजकीय मतलबासाठी सुरू आहे तो निषेधार्ह आहे. पुणे पोलिसांनी भीमा-कोरेगावच्या दंगलीमागच्या सूत्रधारांना आता अटक केली व हे सर्व लोक विध्वंसक विचारांचे नक्षलवादी आहेत. ज्यावेळी या लोकांनी दंगलीचा भडका उडवला त्यावेळी सरकारने काहीच केले नाही. आता सरकारने दंगलीमागच्या हातांना बेड्या ठोकल्या. हेच लोक मोदी-फडणवीसांना मारण्याचा कट रचत होते. हे सगळे रोमांचक तितकेच थरारक आहे. अर्थात या कथानकात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळे विरोधकांना टीकेस वाव मिळाला आहे.

 

Related posts

गोवा विधानसभेत प्रमोद सावंत आज बहुमत सिद्ध करू शकणार का ?

News Desk

समाजवादी पार्टीने शिवसेनेचे टेन्शन वाढवले, मुख्यमंत्र्यांना ‘सपा’ने विचारले ‘हे’ तीन महत्वाचे प्रश्न

Aprna

“शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर ‘नेते पदा’ला कुठलीही किंमत राहीली नाही”, रामदास कदम यांचा राजीनामा

Aprna