HW Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. शोपियान जिल्ह्यातील केल्लर येथे गुरुवारी (२८ मार्च) सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. या परिसरात आता जवानांकडून शोध मोहीम सुरु आहे. या दरम्यान, दहशतवाद्यांकडील मोठा शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

सुरक्षा दलाला केल्लर येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच भारतीय लष्कर, भारतीय सुरक्षा दलाचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दहशतवाद्यांना ठार केले आहे. गुरुवारी पहाटेच जम्मू-काश्मीर पोलीस आणि जवानांनी परिसरात शोध मोहीम सुरु केली होती. ठार मारण्यात आलेल्या ३ दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने शोध मोहीम राबविण्यात आली आहे.

Related posts

नेतन्याहू यांनी पत्नी सारासह चरखा चालवला आणि पतंगही उडवली

Swarit Tandon

गंगा नदीत नाव उलटली २१ जणांचा मृत्यू तर अनेकजण बेपत्ता

News Desk

बलात्कार प्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा!

News Desk