नवी दिल्ली | पाकिस्तानचे उप उच्चायुक्त सय्यद हैदर यांना परराष्ट्र मंत्रालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद झालेल्या भीषण हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. याचा बदल घेत मंगळवारी (२६ फेब्रुवारी) पहाटे ३.३० च्या सुमारास भारतीय वायू दलाच्या ‘मिराज-२०००’ या १२ लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर १००० किलोचे बॉम्ब टाकले. यावेळी सामान्य नागरिकांना कोणतीही हानी पोहोचणार याची देखील दक्षता घेण्यात आली होती. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान खवळून काहीतरी कुरघोडी करणार हे स्पष्ट असल्याने देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांना, संवेदनशील ठिकाणांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.
Delhi: Pakistan Deputy High Commissioner Syed Haider Shah (on the right) arrives at South Block after being summoned by Ministry of External Affairs. pic.twitter.com/2GwxqApWLE
— ANI (@ANI) February 27, 2019
भारताच्या हवाई हद्दीमध्ये आज (२७ फेब्रुवारी) पाकिस्तानी लढाऊ विमान शिरल्याची महत्त्वाची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली होती. नौशेरा सेक्ट्रमधील राजौरी येथे पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले होते. काहीच वेळापूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत माहिती दिली. “भारतीय वायू दलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले मात्र वायू दलाचे एक विमान अद्याप परतले नसून भारतीय दलाचा एक पायलट देखील परतलेला नाही”, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी यावेळी दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.