HW News Marathi
देश / विदेश

सर्वोच्च न्यायालयाने नागेश्वर राव यांना दिली कामकाज होईपर्यंत थांबण्याची शिक्षा

नवी दिल्ली | सीबीआयचे अतिरिक्त संचालक नागेश्वर राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अनोखी शिक्षा देण्यात आली आहे. न्यायालयाचा अवमान केल्‍या प्रकरणी न्यायालायने आज (१२ फेब्रुवारी) राव यांना १ लाख रुपये दंड आणि न्यायालयाचे दिवसभर कामकाज होईपर्यंत थांबण्याची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सुनवालेल्या शिक्षेमुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जाते.

आलोक वर्मा आणि राकेश वर्मा या सीबीआयच्या दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांमधील वाद समोर आल्यानंतर मोदी सरकारने राव यांची सीबीआयचे हंगामी संचालक म्हणून नियुक्ती केली होती. यानंतर मुझफ्फरपूर निवारागृह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची बदली सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय केली जाऊ नये, अशा सूचना राव यांना देण्यात आल्या होत्या. तरी देखील राव यांनी तपास पथकाचे प्रमुख असलेल्या ए. के. शर्मा यांची १७ जानेवारीला सीआरपीएफमध्ये बदली केली. यानंतर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी काल राव यांनी बिनशर्त माफी मागितली होती.

मुझफ्फरपूर जिल्ह्यातील वसतिगृहातील मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार गेल्या वर्षी समोर आले होते. या प्रकरणाचा सीबीआयकडून सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. त्‍यामुळे या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची बदली करु नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिले होते. मात्र राव यांनी सीबीआयच्या अतिरिक्‍त संचालक पदाचा कार्यभार स्‍वीकारल्‍यांनतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची बदली केली होती. यासाठी तत्कालीन संचालक नागेश्वर राव यांना न्यायालायने फटकारले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#JammuAndKashmir : लोकसभा आणि राज्यसभेत अमित शहांचे निवेदन

News Desk

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर खडसेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

अयोध्येचा प्रश्न कश्मीरसारखा बनू नये !

News Desk