नवी दिल्ली | भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मेंदूची शस्त्रक्रिया झाली आहे. आणि त्यांना कोरोनाची लागण देखील झाली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्याने आर्मी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
आज (१३ ऑगस्ट) सकाळपासून प्रणव मुखर्जी यांचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर वायरल होत होती. मात्र ही बातमी खोटी असल्याची माहिती आर्मी रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे आणि त्यांच्या मुलीनेही प्रणव मुखर्जींची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटलयं. तसेच, त्यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत वडलांची तब्येत ठीक आहे असे ट्विट केले आहे.
My Father Shri Pranab Mukherjee is still alive & haemodynamically stable !
Speculations & fake news being circulated by reputed Journalists on social media clearly reflects that Media in India has become a factory of Fake News .— Abhijit Mukherjee (@ABHIJIT_LS) August 13, 2020
माजीराष्ट्रपती प्रणव मुखर्जी हयात असून अजूनही ते व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती आर्मी रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहेत्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी ही पूर्णपणे खोटी आहे हे सिद्ध झाले आहे.
दरम्यान १० ऑगस्टला भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. या संदर्भात प्रणव मुखर्जी यांनी स्वत:चं ट्वीट करून ही माहिती दिली होती.प्रणव मुखर्जी यांनी ट्विट केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, आपण एका दुसऱ्या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला कोरोनाची लागण झाली असल्याचे समजले. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कृपया स्वत:ला क्वारंटाईन व्हावे, तसेच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती आहे.
On a visit to the hospital for a separate procedure, I have tested positive for COVID19 today.
I request the people who came in contact with me in the last week, to please self isolate and get tested for COVID-19. #CitizenMukherjee— Pranab Mukherjee Legacy Foundation- PMLF (@CitiznMukherjee) August 10, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.