नवी दिल्ली | देशाला कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागेत आहे. कोरोना संपल्यानंतर गरिबांसाठी जवळपास ६८ हजार कोटी रुपयांची गरज असून गरिबांच्या पाठिशी खंबरपणे उभे राहण्याची गरज आहे, अशी भिती मत माजी आरबीयआय गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन व्यक्त केले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (३० एप्रिल ) रघुराम राजन यांच्यासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना म्हणाले. यावेळी रघुराम राजन यांनी कोरोनाचे संकट संपल्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती कशी असले?, सरकारला कोणते निर्णय घ्यावे लागतील ? आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कोणते महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, आदी प्रश्नावर चर्चा केली.
A conversation with Dr Raghuram Rajan, former RBI Governor, on dealing with the #Covid19 crisis. https://t.co/cdJtJ7ax0T
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 30, 2020
कोरोना संपल्यानंतर गरिबांसाठी जवळपास ६८ हजार कोटी रुपयांची गरज असून गरिबांच्या पाठिशी खंबरपणे उभे राहण्याची गरज आहे, असे मत राजन यांनी व्यक्त केले आहे. देशाची जीडीपी जवळपास २०० कोटी असताना ही किंमत खूपच कमी आहे, आणि प्रश्न गरिबांच्या जीवाचा असेल तर हा खर्च व्हायला हवा, असेही रघुराम राजन यांनी राहुल गांधीसोबत झालेल्या चर्चे म्हटले. देशात आत्तापर्यंत ३१ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर आत्तापर्यंत १००० हून अधिक जणांना आपला जीव गमावलाय. लॉकडाऊन संपवायचे असेल तर आपल्याला दररोज २० लाख चाचण्या कराव्या लागतील. अमेरिकेपेक्षा चौपट चाचण्या करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे, याकडे राजन म्हणाले
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.