HW News Marathi
देश / विदेश

संयुक्त राष्ट्र संघात फ्रान्स ‘मसूद अझर’वर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडणार

नवी दिल्ली | जम्‍मू काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीए झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍याl भारताचे ४० जवान शहीद झाले आहे. या हल्ल्याचा सर्व स्थरातून निषेश व्यक्त केला जात आहे. संपूर्ण जगातून या दहशतवादी हल्लाचा तीव्र निषेध केला जात आहे. यात आता फ्रान्सकडून संयुक्‍त राष्‍ट्र संघामध्ये पाकिस्‍तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेला आणि भारतात घडविलेल्‍या अनेक दहशतवादी कारवायांना रणनिती आकणार मसूद अझरवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडणार आहेत.

भारताच्या दृष्‍टीने ही महत्‍वापूर्ण बाब आहे. याआधीही २०१७ मध्ये अमेरिकेने इंग्लंडच्या समर्थनाने युएनच्या सेक्‍शन कमिटी १२६७ नुसार पाकिस्‍तानी दहशववादी संघटनेला प्रतिबंध घालण्याची मागणी केली होती. परंतु नेहमीप्रमाणे चीनकडून यांचा कडवा विरोध केला होता. येत्या एक ते दोन दिवसांत फ्रान्स संयुक्‍त राष्‍ट्रसंघात याबाबत प्रस्‍ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती फ्रान्सच्या सूत्रांनी पीटीआयला दिली आहे. मसूद अझरला दहशतवादी संघटनेच्या लिस्‍टमध्ये सामील करण्याची मागणी देखील केली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार फ्रान्सच्या प्रस्‍तावावर फ्रान्सच्या राष्‍ट्रपतींचे कुटनीती सल्‍लागार आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्‍लागार अजित डोभाल यांच्यामध्ये या विषयी चर्चा झाली आहे. यामध्ये दोन्ही देशांनी राजकीयदृष्‍ट्‍या या विषयावर एकत्र येवून काम करायचे ठरवले आहे.

भारताने पाकिस्‍तानचा बुरखा आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर फाडला आहे. पाककडून कशा पध्दतीने दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे. हे जगासमोर आणण्यासाठी भारताकडून आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर जोरदार प्रयत्‍न सुरू आहेत. तसेच हल्‍ल्‍याच्या एक दुसर्‍या दिवशी भारताकडून पाकिस्‍तानचा मोस्‍ट फेवर्ड नेशन दर्जा देखील काढून घेण्यात आली आहे. यामुळे पाकिस्‍तानची आर्थिंक कोंडी होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्व खाद्यतेले, तेलबियांच्या साठ्याची मर्यादा ‘या’ तारखेपर्यंत वाढवली

News Desk

ही ममता बॅनर्जींची इमर्जन्सी आहे, आमची नाही !

News Desk

ईव्हीएमला नकार…बॅलेट पेपरला होकार, राष्ट्रीय जनआंदोलनातर्फे मागणी

News Desk