HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानकडून गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी, इम्रान खानकडून टीमचे अभिनंदन

मुंबई | पाकिस्तानकडून गझनवी क्षेपणास्त्राची आज (२९ ऑगस्ट) चाचणी करण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २९० कि.मीपर्यंत असल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. कराचीजवळ सोनमियानी परीक्षण केंद्रावरुन या क्षेपणास्त्राचे परीक्षण करण्यात आले. काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसा पाठिंबा न मिळाल्याने पाकिस्तानने आधीच बॅलेस्टिक क्षेपणास्त्र परीक्षणाची धमकी दिली होती.

काश्मीरमधून कलम ३७० हटवल्‍याने पाकिस्‍तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. यात पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा मांडला. परंतु त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान एकटा पडला. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचे वातावरण निर्माण करुन जगाचे लक्ष जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर केंद्रीत करण्याचा पाकिस्तानचा इरादा आहे.

पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने बुधवारीच (२८ ऑगस्ट) कराची विमानतळाचे तिन्ही मार्ग २८ ऑगस्टपासून ३१ ऑगस्टपर्यंत बंद केले आहेत. तसेच नोटीस टू एअरमन जारी करुन सर्व बंदरांवर सतर्कतेचा इशारा दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय सैन्याकडून पाक विरोधात मोठी कारवाई

News Desk

आगीत दहा जणांचा मृत्यू

News Desk

ट्विटरकडून ‘ती’ चूक दुरुस्त! उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या अकाऊंटला पुन्हा ‘ब्लू टिक’

News Desk