HW Marathi
देश / विदेश मनोरंजन

ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन

बंगळुरू |  कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेता गिरीश कर्नाड यांचे आज (१० जून) प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. गिरीश  वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांच्या बंगळूर येथील निवासस्थीन अखेरचा श्वास घेतला. मराठी चित्रपट ‘उंबरठा’मध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. पद्मश्री, पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तुघलक, नागमंडल, हयवदन या मराठी नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले.

गिरीश कर्नाड यांचा जन्म १९ मे १९३८ रोजी माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला. कर्नाडांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण झाले.  त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले.

गिरीश कर्नाड यांनी चित्रपटसृष्टीत वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. गिरीश कर्नाड यांचा हा चित्रपट एस. एल. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते. नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

गिरीश कर्नाड हे १९७६-७८ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित केले आहे.

Related posts

आसाममध्ये बॉम्बस्फोट, 11 लोक जखमी

News Desk

#PulwamaAttack : जावेद अख्तर-शबाना आझमी देशद्रोही, सिद्धूची गाढवावरुन धिंड काढावी !

News Desk

अखेर अहमद पटेल जिंकले

News Desk