मदुराई | तामिळनाडुतील मदुराई येथे प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत जवळपास १०० किलोग्रॅम सोन्याची बिस्कीटे जप्त केली आहेत. त्याचबरोबर १६३ कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. कर विभागाने टाकलेल्या धाडीतून मिळालेली आजपर्यंतची सर्वात मोठ संपत्ती असल्याचे म्हटले जाते. बांधकाम व्यावसायिक कंपनीवरही धाड टाकल्याची माहिती मिळाली आहे.
Gold biscuits weighing around 100 kg and Rs 163 crore in cash that is suspected to be unaccounted, seized by the Income Tax department from 20 locations of SPK company in Madurai, Aruppukkottai, Vellore and Chennai. Raids started y'day, still underway at few locations. #TamilNadu pic.twitter.com/LY5fgyS9TM
— ANI (@ANI) July 17, 2018
कर विभागाने मुदराईतील एसपीके कंपनीच्या वेगवेगळ्या २२ ठिकाणी धाड टाकली आहे. अरुप्पुकोटाई, वेल्लोर आणि चेन्नई येथील या कंपनीच्या कार्यालयात सोमवारी धाडी टाकल्या आहेत. ही कंपनी सरकारच्या महामार्गांचे कंत्राट घेते. कर विभानाने या धाडीत जवळपास १०० किलो सोने आणि १६३ कोटी(अंदाजे) रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या आधी २०१६ नोटाबंदीच्या काळात कर विभागने ११० कोटीची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.