HW News Marathi
देश / विदेश

गुगलनेही सर्व कर्मचाऱ्याना वर्क फ्रॉम होमचे दिले आदेश

नवी दिल्ली | भयानक अशा कोरोना व्हायरसमुळे ४ हजाराहून अनेक जणांनी प्राण गमावले आहेत. भारतातदेखील कर्नाटकातील ७६ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जगभरात पसरलेल्या या विषाणूचा परिणाम गुगलवरही झाला आहे. गुगलच्या बेंगळुरू येथील एका कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर येताच गुगलने सर्व कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले आहे. काल (१२ मार्च) ट्विटरनेही आपल्या जगभरातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत.

जगभरात १०० हून अधिक देशात कोरोना व्हायरस पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ट्विटरने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे आदेश दिले आहेत. काम करण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही, असे आदेश ट्विटरने आपल्या सर्वच्या सर्व म्हणजे जवळपास ५ हजार कर्मचाऱ्यांना दिले आहेत. जगातील अर्थव्यवस्थेला कोरोना व्हायरसमुळे मोठे नुकसान सोसावे लागत आहे. मायक्रोब्लॉगिंग साइट म्हणून ओळख असलेल्या Twitter ने जगभरातील आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. कोरोनाच्या भीतीने सुरक्षेचा उपाय म्हणून अॅपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि फेसबुक या सारख्या कंपन्यांनी आपले मोठे-मोठे कार्यक्रम रद्द केले आहेत. अॅपलने ३१ मार्च रोजी होणारा मोठा कार्यक्रम देखील नुकताच रद्द केला आहे. या कार्यक्रमात सर्वात स्वस्तातील आयफोन लाँच करण्यात येणार होता. पण अॅपलनेही आपल्या सर्व कमर्चाऱ्यांना घरातून काम करण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या पत्नी सोफी यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत कॅनडाच्या प्रमारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान ट्रूडो यांची पत्नीला कोरोनाची लागण झाली की नाही याबाबच चाचणी घेण्यात आली होती. तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चक्रीवादाळाने इतिहास भूगोल बदलला

News Desk

“भाजप हारला कोरोना जिंकला”, राऊतांचा भाजपला सणसणीत टोला

News Desk

शैक्षणिक संस्थांनामध्ये हिजाब बंदी योग्यच; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय

Aprna