नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणूकीच्या तारखा आज दुपारी निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार आहेत. गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होईल. गुजरात विधानसभेची मुदत २३ जानेवारीला संपत आहे. हिमाचल प्रदेशच्या निवडणूकी बरोबरच गुजरातच्या तारखाही निवडणूक आयोगाकडून जाहीर केल्या जातील अशी अपेक्षा होती. मात्र त्यावेळी आयोगाने केवळ हिमाचल प्रदेश निवडणूकीच्याच तारखा जाहीर केल्या. त्यामुळे निवडणूक आयोगावर पक्षपाती पणाचा आरोप झाला. विरोधकांनी तर निवडणूक आयोग केंद्र आणि राज्य सरकारला मदत करणारी भूमिका घेत असल्याची टिका केली. मात्र गुजरातमधील पूरग्रस्तांचे पुनर्वसन, सण या कारणामुळे गुजरात निवडणूका जाहीर केल्यानाहीत असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाला द्यावे लागले होते. या पार्श्वभूमिवर आज गुजरात निवडणूकीच्या तारखा जाहीर होतील. गुजरातचे वातावरण आधीच तापलेले आहे. तारखा जाहीर झाल्यानंतर ते आणखीन तापण्याची दाट शक्यता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.