HW News Marathi
देश / विदेश

गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वादग्रस्त सरदार सरोवराचे मोंदीच्या हस्ते लोकार्पण

अहमदाबाद- जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठ्या सरदार सरोवराचे लोकार्पण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवशी करण्यात येणार आहे. गुजरात विधानसभेची निवडणूक तोंडावर असल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने धरण लोकार्पणाचा कार्यक्रम म्हणजे जंगी राजकीय प्रचारसभाच बनवला आहे.

लोकार्पणानंतर पंतप्रधान डभोई येथे सभा घेणार आहेत. धरण लोकापर्ण सोहळा अहमदाबादपासून २०० किलोमीटवर आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन १९६१ मध्ये झाले होते. मात्र, दप्तरदिरंगाई, विस्थापितांचा विरोध,न्यायालयीन लढा यामुळे प्रकल्प साठ वर्षे रेंगाळला.

सरदार सरोवर प्रकल्पाची मूळ उंची १२१.९२ मीटर होती. ती १३८ मीटरपर्यंत वाढविण्यासाठी जून २०१६पासून प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्याचा आदेश नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने दिला होता. उंची वाढविल्यामुळे धरणाची पाणी साठविण्याची क्षमता सध्या १.२७ दशलक्ष घनमीटरवरून ४.७३ दशलक्ष घनमीटरपर्यंत वाढली आहे. या प्रकल्पाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरीही उपकालवे आणि काही किरकोळ कामे अद्याप बाकी आहेत.

दरम्यान, सरोवराची उंची वाढल्यानंतर अनेकजणांना याचा फटका बसणार आहे. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला होता. त्याचे लोकार्पण झाल्यानंतर केवळ गुजरातमधील जनतेला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु धरणाची उंची वाढल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका मध्यप्रेदशमधील शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

केजरीवालांनी महिलांच्या सुरक्षेसाठी मेट्रो आणि बसमध्ये प्रवास केला मोफत

News Desk

छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात दूरदर्शनच्या कॅमेरामनचा मृत्यू

swarit