HW News Marathi
देश / विदेश

मशिदीसाठी हाफिज सईदची मदत, ३ जण एनआयएच्या ताब्यात

हरियाणा | हरियाणामधील पलवाल जिल्ह्यातील उत्तवार गावामध्ये खुलाफा ए रशीदीन ही मशिद एनआयएच्या रडारवर आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि ‘लश्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदने या मशिदीच्या बांधकामासाठी आर्थिक मदत केल्याचा आरोप केला जात आहे. २६ सप्टेंबरला एनआयएच्या पथकाने या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून यात मशिदीतील इमाम मोहम्मद सलमान (५२) याचा समावेश आहे. त्याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले होते.

हरियाणामधील पलवाल जिल्ह्यातील खुलाफा ए रशीदीन मशिदीवर एनआयएने ३ ऑक्टोबरला छापा टाकला होता. मोहम्मद सलमानबरोबरच मोहम्मद सलीम आणि सज्जाद अब्दुल वाणी या दोघांना २६ सप्टेंबरला एनआयएकडून अटक करण्यात आली होती. या मशिदीत जमा होणाऱ्या देणग्यांचा कुठे कुठे वापर केला जात होता, याचा तपास सध्या सुरु आहे.

लाहोर येथील फलाह ए इन्सानियत फौंडेशनकडून आर्थिक मदत घेतल्याचा आरोप खुलाफा ए रशीदीन मशिदीच्या पदाधिकाऱ्यांवर केला आहे. यासंदर्भात एनआयएकडून मशिदीच्या पदाधिकाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. या पदाधिकाऱ्यांची बँक खाती, इतर महत्त्वाची कागदपत्रे तपासली जात आहेत. ही मशिद वादग्रस्त जमिनीवर बांधण्यात आली असून मोहम्मद सलमानचा लश्कर ए तोयबाशी संबंध असल्याची माहिती आम्हाला नव्हती, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

 

Related posts

सर्व गोष्टींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा असेल तर आयपीसीमधील इतर कलमांचा उपयोग काय? राऊतांचा केंद्राला सवाल  

News Desk

चंद्रबाबू नायडू यांच्या घरावर बुलडोजर फिरवणार ?

News Desk

देशाची वाटचाल गुलामगिरीकडे- राहुल गांधी

News Desk