नवी दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे ७ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच शुक्रवारी देशाली काही राज्यांत शाळा, तसेच महाविद्यालयांना सुट्टी देखील देण्यात आली आहे. देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी अटलजींच्या अंत्य दर्शनासाठी दिल्लीत रीघ लावली आहे. राजकीय दुखवटा असल्यामुळे देशाचा राष्ट्रध्वज ७ दिवस अर्धावर फडकविण्यात येणार आहे.
Delhi High court & all District courts to function till 1 pm today. The competent authority has decided that there will be half-day holiday today to allow officials & staff to attend the funeral of former PM #AtalBihariVajpayee at Smriti Sthal.
— ANI (@ANI) August 17, 2018
तसेच शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्व जिल्हा न्यायालये ही दुपारी १ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला आज अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्यात येणार आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आज दुपारी ४ वाजेपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेता यावे म्हणून अधिकारी व कर्मांची वर्गाला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.