HW Marathi
देश / विदेश राजकारण

अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयात आज (११ जुलै) अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी अत्यंत महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय मध्यस्ती समितीच्या कामात विशेष प्रगती नसल्याचे निदर्शनास आणून देत या प्रकरणाची सुनावणी जलद गतीने व्हावी अशी मागणी करणारी याचिका हिंदू पक्षकार गोपाल सिंह विशारद यांनी केली. यावर आज सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी ८ मार्च रोजी अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी माजी न्यायमूर्ती एफ.एम.आय. खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय मध्यस्ती समितीची स्थापना केली होती. ध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ श्रीराम पंचू हे समितीचे सदस्य आहेत. १० मे रोजी या प्रकरणी १५ ऑगस्टपर्यंत त्रिसदस्यीय मध्यस्ती समितीला मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, हि समिती धीम्या गतीने काम करीत असल्याचे गोपाल सिंह विशारद यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

Related posts

ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा

News Desk

शेतकरी प्रश्नावरुन भाजपा सरकारवर ठाकरेंचे टीकास्त्र

News Desk

आज पुन्हा पेट्रोल १५ तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त

Gauri Tilekar