HW News Marathi
देश / विदेश

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून केरळ पुरग्रस्तांसाठी मदत मोहीम 

मुंबई ।केरळमध्ये अनेक दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यभर पूरस्थिती निर्माण झाली आणि नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागले.त्यामुळे पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा हात पुढे येत आहे. आता मुंबईतील सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून केरळ मधील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. पुरग्रस्तांसाठी निधी संकलन केंद्र ठेवण्यात आले असून येथे २० रुपये मदतीची पावती देखील ठेवण्यात आली आहे. सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून लोकांना सूचना करण्यात येत आहे की एक हात मदतीचा पुढे येऊद्या पुरग्रस्तांना मदत करा.

 

केरळमधील मृतांचा आकडा ३००च्या पार गेला असून सध्या केरळची स्थिती फारच दयनीय आहे. तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तसेच परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबई, पुणे, दिल्ली, तेलंगणा पंजाब इ.अनेक राज्यांतून केरळला मदत करण्यात आली आहे. राज्य सरकारसह एमसीएचआय-क्रेडाई, राजस्थानी वेल्फेअर असोसिएशन, जितो इंटरनॅशनल, रिलायन्स रिटेल यासारख्या विविध संस्थादेखील केरळ पूरग्रस्तांना मदत करीत आहेत. आता मुंबई सेंट्रल रेल्वे मजदूर संघ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मदत मोहीम राबविण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

केंद्र सरकारने नाकारली केरळसाठी यूएईची मदत

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसह मुंबई-पुण्याहून ८१ डॉक्टरांची टीम केरळला रवाना

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परीक्षा पे चर्चा २.० : आपली स्वप्ने आपल्या मुलांवर थोपविणे अयोग्य | मोदी

News Desk

छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दलाकडून २ नक्षलवाद्यांना कंठस्नान

News Desk

उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू यांची निवड

News Desk