HW News Marathi
देश / विदेश

रामदास आठवले यांच्याकडून केरळला मदत

एर्नाकुलम | केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दोन महिन्यांचे मंत्रिपदाच्या वेतनाचा चार लाख रुपयांचा धनादेश आधीच केरळच्या मल्लपुरम जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला आहे. तसेच एर्नाकुलम येथे त्यांच्या खासदार निधीतून 25 लाख रुपयांचा निधीदेखील केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देत असल्याचे जाहीर केले आहे.

 

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले केरळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी मल्लपुरम जिल्ह्याचा दौरा केला. एर्नाकुलम येथील कलमाचेरी तालुक्यातील अलुवा गावात पुरग्रस्तांच्या मदतकार्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली. पुरग्रस्तांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. कलमाचेरी येथे जिल्हा प्रशासनासोबत रामदास आठवले यांनी बैठक घेऊन मदत कार्याची माहिती घेतली. कलमाचेरी येथील पेरिय नदीला आलेल्या महापुरात अलुवा गाव आणि परिसर उध्वस्त झाला होता.त्याभागाची आज रामदास आठवले यांनी पाहणी केली. केरळ पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उद्योगपतींनीही मदत करण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंकीपॉक्सला WHO ने घोषित केली जागतिक आरोग्य आणीबाणी

Aprna

कारवारजवळ समुद्रात बोट बुडून अपघात, १६ जणांचा मृत्यू

News Desk

ताजमहालची निगा राखा नाही, तर पाडून टाका | सर्वोच्च न्यायालय

News Desk