HW News Marathi
Covid-19

देशात एका दिवसात ५ हजार २४२ सर्वाधिक रुग्णवाढ

मुंबई | देशात लॉकडाऊनला आजपासून सुरुवता झाली आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासात कोरोनाच्या ५ हजार २४२ नव्या रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात रुग्णांच्या संख्येत झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. तर कोरोनामुळे १५७ जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६ हजार १६९ वर पोहोचली आहे. तर ३६ हजार८२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्य गेल्या तीन दिवसांमध्ये दुप्पट वाढत आहे. देशात काल (१७ मे) कोरोना व्हायरसचे जवळपास पाच हजार नवे रुग्ण समोर आले आहेत. मृत्यूदरात घट होऊन ३.१ टक्क्यांवर आला आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून हा दर ३७.५ टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली.

राज्यात एका दिवसात २ हजार ३४७ नवीन रुग्णांची नोंद

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. राज्यात काल एका दिवसात २ हजार ३४७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यात सध्या चिंतेचे वातावरण आहे. राज्यातील दिवसेंदिवस वाढ्यात कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काल ३१ मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. तर राज्यात काल ६०० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७६८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २४ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद; BMC निर्णय

Aprna

मुंबईतल्या गर्दीवर मुख्यमंत्री ठाकरे नाराज, निर्बंध आणखी कडक करण्याचा दिला इशारा

News Desk

देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार २९१ रुग्णांची कोरोनावर मात!

News Desk