HW News Marathi
देश / विदेश

विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला हिमाचल प्रदेशमध्ये अपघात

नवी दिल्ली | हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाला येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांची बस उलटली आहे. या अपघातात ३५ विद्यार्थी जखमी झाले असून ५ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात हिमाचल प्रदेशमधील भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली आयोजित करण्यात आली आहे.

नगरोटा सुरिया भागातील कॉम्प्युटर सेंटरच्या स्किल डेव्हलपमेंटचे ४५ विद्यार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीत सहभागी व्हायला जात होते. त्यावेळी कांगरा भागातील लुंजजवळ चालकाचा बसवरील ताबा सुटला व बस उलटली. त्यानंतर स्थानिकांनी मुलांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाकडून ‘सेऊल शांतता पुरस्कार’ प्रदान

News Desk

भारतातील ‘या’ राज्यात आढळला कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण

swarit

शबरीमला प्रकरणाची सुनावणी लांबणीवर

News Desk