HW News Marathi
देश / विदेश

शंभर वर्षांनतर पूर्ण सूर्यग्रहण पाहण्याची संधी, अमेरिकेने जाहीर केली सुटी

कोट्यवधी रुपयांचे होणार नुकसान

नवी दिल्ली( वृत्तंस्था) – तब्बल शंभर वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अमेरिकन नागरिकांना संपूर्ण सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी अमेरिकेत सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. फोर्बने दिलेल्या माहितीनुसार हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी अमेरिकेला साडेचार हजार कोटी रुपयांचा भूर्दंड पडणार आहे. दरम्यान, यातून काहींना कमाईचीही संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. सूर्यग्रहणादरम्यान, अनेक आईटी कंपन्या व इतर कार्यालये बंद राहणार आहेत, त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सूर्यग्रहण पाहण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जात असून यातून फूड, ब्रेवरेज कंपन्यांनी कमाईची संधी मिळणार आहे. कोल्डींग, कॉफी, स्नॅक्स, आईसक्रिमची विक्रमी विक्री होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या शिवाय कॅमेरा, चष्मा बनवणाऱ्या कंपन्यांची चांदी होणार आहे. नासाच्या शास्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आजचे सूर्यग्रहण सर्वात मोठे असणार आहे, त्याचा कालावधी सुमारे पाच तास 18 मिनिटांचा असेल. भारतात सकाळी सव्वा दहा ते रात्री अडीचपर्यंत ग्रहण दिसेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कठुआ बलात्कार प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जगाला हेवा वाटेल असे स्मारक महाविकास आघाडी उभारणार !

News Desk

अखेर अहमद पटेल जिंकले

News Desk