नवी दिल्ली । पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून व्लादिमीर पुतीन यांचे स्वागत केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “राष्ट्रपती पुतीन तुमचे भारतामध्ये स्वागत आहे. मी द्विपक्षीय चर्चेसाठी उत्साही आहे. ज्याने भारत आणि रशियाची मैत्री अजून घट्ट होईल”. व्लादिमीर पुतीन हे गुरुवारी दोन दिवसासाठी भारत दौऱ्यावर आले आहेत. पुतीन यांचे स्वागत नवी दिल्लीमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केले होते. तिथून ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी रवाना झाले व तिथे त्यांनी स्नेहभोजन केले.
Welcome to India, President Putin.
Looking forward to our deliberations, which will further enhance India-Russia friendship. @KremlinRussia_E pic.twitter.com/IlGwRrXgAK
— Narendra Modi (@narendramodi) October 4, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांच्या मध्ये आज (शुक्रवारी ५ ऑक्टोम्बर ) द्विपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकी दरम्यान एस-४०० या मिसाईल सिस्टिमच्या करारावर एकमत होण्याची शक्यता आहे. या एस-४०० या मिसाईल सिस्टीममुळे चीनच्या ४००० किलोमीटर पर्यंतच्या सीमेवर भारत लक्ष ठेऊ शकतो. याच बैठकी दरम्यान अमेरिकेच्या मंजुरीच्या दृष्टीने क्रूड तेलाच्या, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय समस्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच भारत व रशिया मध्ये स्पेस कॉपरेशन मॅकॅनिज्म याचा करार होण्याची ही
शक्यता आहे. २०२२ मध्ये चंद्रावर माणूस पाठवण्याच्या मोहिमेच्या दृष्टीने करार महत्वाचा आहे.
तज्ञांच्या मते, अमेरिका एस-४०० ही मिसाईल खरेदी करण्यासाठी विरोध करत आहे कारण, एस-४०० या सिस्टीमचा वापर अमेरीकेच्या फायटर जेट्सची क्षमता तपासण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी चिंता अमेरिकेला आहे. इतकच नव्हे तर या सिस्टीममुळे अमेरिकेच्या जेट्सचा डेटा लीक होऊ शकतो आणि शत्रू राष्ट्रांना तो पुरवला जाऊ शकतो, अशी भिती देखील अमेरिकेला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.