HW Marathi
देश / विदेश

पाकिस्तानचे एफ-१६ लढाऊ विमान भारतानेच पाडल्याचे वायुसेनेकडून पुरावे

नवी दिल्ली | भारतीय वायु दलाने पाकिस्तानच्या एफ-१६ विमान पाडल्याचे पुरावे काल (८ एप्रिल) दिले आहेत. हवाई दलाने एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम रडारवरील छायाचित्रेही पुरावे एअर वाईस मार्शल आरजीके कपूर यांनी पत्रकार परिषदेत सादर केले आहे.  पाकिस्तानकडून  पसरविण्यात येत असलेल्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार केला.

या रडारच्या छायाचित्रा बद्दल कपूर यांनी सांगितले की, यात लाल वर्तुळात तीन विमाने दिसत आहेत आणि ती पाकिस्तानची एफ-१६ विमाने आहेत. उजव्या बाजूला निळ्या वर्तुळात पायलट अभिनंदन वर्धमान यांचे मिग-२१ बायसन विमान असल्याचे दिसत आहे. काही वेळानंतरच घेण्यात आलेल्या दुसर्‍या छायाचित्रात पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान दिसत नाही. प्रत्यक्षात ते नष्ट झाले होते. एअर व्हाईस मार्शल कपूर यांनी सांगितले. पाकिस्तानचे एफ-१६ हे विमान पाकव्याप्त काश्मीरतील सब्जकोट भागात पडल्याचे पुरावे दिले गेले.

पुलवामामध्ये १४ फेब्रुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर भारतीय वायुदलाने २६ फेब्रुवारी रोजी बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला होता. या हल्ल्यात जैशचे ३५० दहशतवादी ठार झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

 

Related posts

काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

चीनमुळे अरुणाचल प्रदेशमध्ये दुष्काळाचे सावट

News Desk

डीएसकेंना 22 फेब्रुवारीपर्यंत दिलासा

Kiran Yadav