HW Marathi
देश / विदेश

चंदा कोचर यांची पतीसमवेत चौकशीसाठी ‘ईडी’च्या कर्यालयात

मुंबई | आयसीआसीआय बॅंकेच्या पुर्व कार्यकारी संचालक आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पति दीपक कोचर तसेच विडीओकॉन कंपनी चे प्रमोटर वेणुगोपाल धूत शनिवारी (२ फेब्रुवारी) तपासणीसाठी ईडी च्या कार्यालयात आले होते. अंमलबजावणी संचनालाया (ईडी) कडून चंदा कोचर यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथे असलेल्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. या कारवाईनंतर शनिवारी कोचर पतीपत्नी मुंबईतील बलार्ड इस्टेट परिसरातील ईडीच्या कर्यालयात चौकशीसाठी पोहचले.

२००९ ते २०११ या वर्षात व्हिडिओकॉन ग्रूपला दिलेल्या १,८७५ कोटी रूपयांच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणी चंदा कोचर यांच्या विरोधात एफआयआर नोंदविला आहे. सीबीआयच्या प्राथमिक तपास अहवालानंतर दीपक कोचर आणि वेणूगोपाल धूत यांच्याविरोधात सर्व विमानतळातवर या नोटीससंबंधी माहिती देण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याविरोधात अशी लुकआउट नोटीस पहिल्यांदाच देण्यात आली आहे.

चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे मॅनेजिंग डायरेक्टर वेणूगोपाल धूत यांच्याविरोधात केंद्रीय अऩ्वेषण विभाग (सीबीआय)ने लुकआउट नोटीस बजावली आहे.सीबीआयच्या या नोटीसमुळे या तिघांनाही देशाबाहेर जाता येणार नाही. सीबीआयकडून २२ जानेवारीला दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये चंदा कोअर यांचे नाव होते, यामुळे त्यांनाही या नोटीसमध्ये आणण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

 

Related posts

बस दरीत कोसळून 30 ठार

News Desk

इस्राईलमध्ये हवाई हल्ल्यात अल-अक्सा टीव्हीची इमारत उध्वस्त

अपर्णा गोतपागर

रशियामध्ये महाभूकंप, कामचटका परिसरात 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

News Desk