दी हेग | भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरी आणि घातपाती कारवाया केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत. या प्रकरणावर आजपासून (१८ फेब्रुवारी) ते गुरुवारी (२१ फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे. या न्यायालयात सलग चार दिवस सुनावणी होणार असून भारत आणि पाकिस्तान आपापली बाजू मांडणार आहेत.
ICJ to start public hearings in Kulbhushan Jadhav’s case today
Read @ANI Story | https://t.co/mYHFbzbkY6 pic.twitter.com/3iHndnNEJ4
— ANI Digital (@ani_digital) February 17, 2019
भारताकडून ज्येष्ठ विधीज्ज्ञ हरीश साळवे आतंरराष्ट्रीय न्यायालयात आज भारताची बाजू मांडडणार आहेत. तर १९ फेब्रुवारीला ब्रिटनमधील क्वीन्स कॉन्सेल खंबर कुरेशी पाकिस्तानचीबाजू मांडतील. २० फेब्रुवारी रोजी भारत त्याला उत्तर देईल व २१ तारखेला पाकिस्तानच्या प्रतिजबाबाने सुनावणीची सांगता होईल. या प्रकरणाचा निकाल येत्या उन्हाळ्यात लागण्याची अपेक्षित आहे. न्यायालयाच्या वेबसाईटवर व संयुक्त राष्ट्रसंघाच्या वेबटीव्हीवर या सुनावणीचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
कुलभूषण यांची आयसीजेमध्ये अशी असणार सुनावणी
ही सुनावणी १८ ते २१ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान कुलभूषण जाधव यांची सुनावणी आयसीजेमध्ये होणार आहे. सुनावणीच्या पहिल्या फेरीत १८ फेब्रुवारीला सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत भारत आपली बाजू मांडणार आहे. तर १९ फेब्रुवारीला सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत पाकिस्तान त्यांची बाजू मांडणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या फेरीत २० फेब्रुवारीला दुपारी ३ ते ४.३० पर्यंत भारताला आणि पाकिस्तानला सुद्धा २१ फेब्रुवारीला सायंकाळी ४.३० ते ६ वाजेपर्यंत त्यांची बाजू मांडण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.