HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रगीताचा अवमान कराल तर ३ वर्ष शिक्षा  

– चीन सरकार कायदा आणण्याच्या तयारीत

बीजिंग – राष्ट्रगीता वेळी उभं रहायचं की नाही या बाबत भारतामध्ये वाद विवाद सुरू असला तरी चीन मात्र आपल्या राष्ट्रगीताचा अवमाना झाला तर त्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. त्या बाबतचा कठोर कायदा चीनच्या संसदेत मंजूर करून घेण्याचा प्रयत्न चीन सरकारकडून सुरू आहे. या कायद्या नुसार जो कोणी राष्ट्रगीताचा अवमान करेल त्याला ३ वर्षाची शिक्षा ठोठावली जाईल असं वृत्त स्थानिक वृत्तवाहिनी शिन्हुआने दिलं आहे. सप्टेंबर महिन्यात चीनने आपलं राष्ट्रगीत ‘मार्च ऑफ द वॉलिंटिअर्स’चा अपमान करणा-यांना 15 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्या संबंधीचा कायदा संमत केला होता. हा कायदा चीनचे नियंत्रण असलेल्या हाँगकाँग आणि मकाऊलाही लागू होता. संसदेने यानंतर राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांसाठी गुन्हेगारी कायद्यात काही बदल करुन फौजदारी खटला दाखल करु शकतो का यावर विचार करत आहे. चीन संसदेच्या सोमवारपासून सुरु झालेल्या स्थायी समितीच्या द्वि-मासिक सत्रात कायद्याचा मसुदा मांडण्यात आला.

उल्लंघन करणा-यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्यासंबंधी मसुद्यात उल्लेख आहे. पण या कायद्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. राष्ट्रगीताचा वापर फक्त नॅशनल पिपल्स काँग्रेसच्या कार्यक्रमांच्या सुरुवातील आणि शेवटी केला जाऊ शकतो. याशिवाय अधिकृत राजकीय सभा तसंच राजकीय कार्यक्रमांसहित मोठ्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत वापरलं जाण्याची परवानगी असणार आहे. चीनने राष्ट्रगीताचा वापर करण्यावरुन 2014 मध्येही नियम केले होते. नियमाअंतर्गत लग्न, अंत्यसंस्कार आणि मनोरंजन तसंच खासगी कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीताचा वापर केला जाऊ शकत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचा कर्नाटक निवडणुकीसाठी जाहीरनामा

News Desk

त्रिपुरा, मेघालय-नागालँड राज्यातील निवडणूक तारखा जाहीर

swarit

हिंदुत्व भडकले, ममतांमुळे हे झाले, त्याबद्दल दीदींचे आभार!

News Desk