HW News Marathi
देश / विदेश

इम्रान खान यांच्या ६ मिनिटांच्या भाषणात २० पेक्षाही अधिक कट्स ?

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या भीषण हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर मोठा दबाव आणला गेला. या पार्श्वभूमीवर आज (१९ फेब्रुवारी) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान, इम्रान खान यांच्या या ६ मिनिटांच्या व्हिडिओत २० हूनही अधिक कट्स असल्याचा प्रकार समोर येत आहे.

इम्रान खान यांच्या या ६ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये १.४० सेकंदांपासून कट्स सुरुवात झाली असून संपूर्ण व्हिडिओमध्ये असे २० हूनही अधिक कट्स आढळून आले आहेत. दरम्यान, हे कट्स आणि एडिट नेमके कोणी आणि कशासाठी केले ? असा प्रश्न विचारला जात आहे. इम्रान खान यांचा हा व्हिडीओ पाकिस्तानी लष्कराकडून एडिट करण्यात आले का ?, असाही गंभीर प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

इम्रान खान नेमके काय म्हणाले ?

“भारतातील माध्यमे, राजकारणी लोक पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा आरोप आमच्यावर करीत आहेत. मात्र, कोणत्याही पुराव्यांअभावी, न्यायव्यवस्थेच्या वर जाऊन तुम्ही आमच्यावर हे आरोप कसे काय करू शकता ?”, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. “भारताने जर आमच्यावर हल्ला करण्याचा विचार केला तर आम्ही विचारही करणार नाही. आम्ही थेट प्रत्युत्तरच देऊ”, असेही इम्रान खान यांनी यावेळी म्हटले आहे.

“लढाई सुरू झाली तर ती कुठल्या स्तरावर जाईल हे अल्लाच जाणतो. तुम्ही पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तान केवळ विचार करणार नाही तर थेट प्रत्युत्तर देईल. भारतात सध्या निवडणुका जवळ आहेत. त्यामुळे असा प्रचार केला जात असेल”, असेही इम्रान खान यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे “काश्मीरमधील तरुण इतके का चिडले आहेत ? ते मरण्यासाठी का तयार झाले आहेत ? यावर भारताने देखील विचार करायला हवा. आम्ही दहशतवादावर चर्चा करायला, चौकशी करायला तयार आहोत. हा नवा पाकिस्तान आहे. तुम्ही चर्चा न करताच आम्हाला दोषी कसे ठरवता ?”, असेही इम्रान खान यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“गुजरातमध्ये ‘आप’चे सरकार येणार”, केजरीवालांची भविष्यवाणी

Darrell Miranda

कोची शिपयार्डमध्ये ओएनजीसीच्या ‘सागर भूषण जहाजावर भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू, 13 जखमी

News Desk

ज्येष्ठ नागरिकाच्या हत्येप्रकरणी वाहन चालकाला जन्मठेप

News Desk