HW News Marathi
देश / विदेश

कश्मीरमध्ये १३ दहशतवाद्यांना कंठस्नान, ३ जवान शहीद

श्रीनगर | जम्मू-कश्मीरच्या शोपियन आणि अनंतनाग या जिल्ह्यात भारतीय लष्कराने १३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून एका दहशतवाद्याला लष्कराने जिवंत पकडण्यात यश आले. या लढ्यात ३ भारतीय जवान शहीद झाले आहेत. तसेच चार स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी रात्रीपासून शोपियन, कचदूरा आणि अनंतनाग या जिल्ह्यात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. दोन्ही ठिकाणी चकमक सुरू होती. त्यानंतर भारतीलय लष्कर आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने दहशतवाद्यांवर हल्ला चढवला.

या दहशतवादी हल्लात अरविंद कुमार, निलेश सिंग आणि हेतराम हे जवान शहीद झाले आहेत. तसेच कश्मीरमध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी श्रीनगर आणि बनिहालमध्ये रेल्वे आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबरी पाडली त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना सामनातून उजाळा

News Desk

लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर आमचा नैसर्गिक हक्क !

News Desk

नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरुन चर्चा

News Desk