नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या २४ तासात देशात १९,१४८ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दिसरभरात ४३४ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ४ हजार ६४१ वर गेली आहे. आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ८५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार १ जुलै पर्यंत एकूण ९० लाख ५६ हजार १७३ नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी २ लाख २९ हजार ५५८ नमून्यांची चाचणी काल (१ जुलै) करण्यात आली. गेल्या १२ दिवसांमध्ये देशात तब्बल २ लाख कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच, दिलासादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
434 deaths and 19,148 new #COVID19 cases in the last 24 hours. Positive cases in India stand at 6,04,641 including 2,26,947 active cases, 3,59,860 cured/discharged/migrated & 17834 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/rlKaWwgkXy
— ANI (@ANI) July 2, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.