HW News Marathi
देश / विदेश

भारतातील सत्ताधारी पक्ष मुस्लिम समाजासह पाकिस्तानविरोधी !

नवी दिल्ली | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये असे म्हटले आहे कि, भारतातील सत्ताधारी पक्ष मुस्लिम समाज आणि पाकिस्तान विरोधी आहे. मी शांततेसाठी केलेल्या सर्व प्रयत्नांकडे भारत सरकारने वारंवार दुर्लक्ष केले आहे. मुंबई हल्ल्यातील गुन्हेगारांबाबत इम्रान यांनी म्हटले कि, “मी सरकारला या प्रकरणाबाबत सद्यस्थितीची माहिती देण्यास सांगितले आहे. हे दहशतवादाशी संबंधित प्रकरण होते. आम्ही हे प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत. मला आशा आहे कि जेव्हा भारतात निवडणुका होतील तेव्हा या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु होईल.”

मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे, ओसामा बिन लादेन अफगाणिस्तानमध्ये होता. यात पाकिस्तानची कोणतीही भूमिका नव्हती, असेही इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. १९८० साली तालिबानी संघटनांच्या विरुद्ध आम्ही अमेरिकेची मदत मागितली होती. परंतु, आम्हाला काय मिळाले ? आमचे ८० हजार लोक मारले गेले. जवळपास साडे दहा लाख करोडचे नुकसान झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

२४ तासांत देशात १०३५ नवे कोरोनाबाधित, देशाचा आकडा ७४४७ वर

News Desk

राज्यात ४६६ नवे ‘कोरोना’बाधित, तर एकट्या मुंबईत ३०८

News Desk

Bhima Koregaon Case : नवलखांची नजकैदेतून सुटका, राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

swarit
देश / विदेश

नीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार

News Desk

नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीच्या मुसक्या आवळायला प्रशासनाने सुरुवात केली आहे. किहीम समुद्र किनाऱ्यावरील नीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडण्याचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दिले आहेत.

अलिबागमधील किहीम गावात नीरव मोदीचा तर मेहुल चोक्सीचा आवास गावात बंगला आहे. हे बंगले उभारताना महसूल आणि सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले होते. त्यामुळे हा बंगला अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई का केली नाही, असा सवाल १ ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना केला होता. अलिबागमध्ये नीरव मोदीसह इतरांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याचे दिसत नाही, अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली होती. न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारने हा विषय गांभीर्याने घेत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

नीरव मोदीसह मेहुल चोक्सी, स्मिता गोदरेज, मधुकर पारेख आणि इतरांचे अनधिकृत बंगले या भागात आहेत. अलिबागमध्ये ६९ आणि मुरुडमध्ये ९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये नीरव मोदीच्या बंगल्याचाही समावेश आहे. तर अनेक सेलिब्रेटींचेही बंगले या यादीत आहेत. कलम १५ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. यामध्ये १ लाख रुपये दंडापासून ५ वर्षे कैद अशी शिक्षेची तरतूद आहे.

Related posts

“बेळगावमध्ये शिवरायांचा पुतळा काँग्रेस नेत्याने हटवलाय, शिवसेना राजीनामा देणार का ?”

News Desk

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात कोरोनाचा हाहाकार

swarit

अफवांना आळा घालण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप बंद

swarit