HW News Marathi
देश / विदेश

नववर्षात भारताने केला आगळा वेगळा विक्रम

नवी दिल्ली | नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारीला जगात भारत हा सर्वाधिक बाळांना जन्म देणारा देश ठरला आहे. युनिसेफने जाहीर केलेल्‍या आकडीवारीनुसार १ जानेवारी रोजी भारतात तब्बल ६९, ९४४ बाळांचा जन्म झाला आहे. या दिवशी जगभरात जन्माला येणाऱ्या एकूण बालकांच्या तुलनेत हे प्रमाण १८ टक्के इतके आहे. त्यामुळे भारताच्या नावावर आगळावेगळा विक्रम नोंदवला आहे.

तसेच भारतापाठोपाठ चीन आणि नायजेरियामध्ये १ जानेवारीला अनुक्रमे ४४,९४० आणि २५,६८५ बाळांचा जन्म झाला आहे. यानंतर पाकिस्तानमध्ये १५,११२, इंडोनेशियात १३,२५६, अमेरिकेत ११,०८६, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये १०,०५३ आणि बांगलादेशमध्ये ८,२४८ बाळांचा जन्म झाला आहे.

युनिसेफच्या बालहक्क करार स्वीकाराचा २०१९ या वर्षामध्ये तिसावा वर्धापनदिन आहे. हे औचित्य साधून युनिसेफतर्फे जगभरात विविध उपक्रम हात घेण्यात येणार आहे. या कराराअंतर्गत प्रत्येक मुलाला चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे, असे युनिसेफचे अध्यक्ष डॉ. यास्मीन अली हक यांनी यावेळी सांगितले.

जगभरात नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी एकूण ३,९५,०७२ बालक जन्माला आले. यांपैकी एक चतुर्थांश मुले ही दक्षिण आशियामध्ये जन्माला आली आहेत. पाकिस्तानमध्ये १ जानेवारीला १५,११२, तर बांगलादेशमध्ये ८,४२८ बालक जन्माला आले आहेत. भारतात २०१७ मध्ये सुमारे दहा लाख बाळांचा मृत्यू झाला होता. असे असले तरी गेल्‍या ५ वर्षांमध्ये भारतात बाल मृत्यू दर सुधारत झाली असून मृत्‍यू दर कमी करणे हे एक आव्हान असल्‍याचे डॉ. यास्मीन अली हक यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघर मॉब लिंचिंगमागे कोणतेही धार्मिक कारण नाही, धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न करू नका !

News Desk

केवळ लष्करालाच नव्हे तर देशालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी करु !

News Desk

अभिमानास्पद ! ‘चांद्रयान – २’ने आज केला चंद्राच्या कक्षेत प्रवेश

News Desk