HW News Marathi
देश / विदेश

भारत-अमेरिका रायफल्स खरेदी प्रस्तावाला अखेर मंजुरी

नवी दिल्ली | गेल्या काही काळापासून रखडलेला भारत अमेरिकेचा रायफल्स खरेदीच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. संरक्षण मंत्रालयाने या रायफल्स खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. भारत अमेरिकेकडून ७३ हजार असॉल्ट रायफल्स खरेदी करणार आहे. या अमेरिकन बनावटीच्या रायफल्स खरेदीसाठी भारताला ७०० कोटी रुपये इतका खर्च येणार असून भारत-चीन सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांना या रायफल्स देण्यात येणार आहेत.

भारतीय जवानांना सुरक्षेच्या दृष्टीने आणखी अत्याधुनिक शस्त्रे देण्यात येणार आहेत. याचकरिता नवीन शस्त्र खरेदीला संरक्षण मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन कंपनीसोबत खरेदी करार झाल्यानंतर पुढच्या एका वर्षाच्या काळात या रायफल्स द्यावी लागतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रुग्णालायातील नर्सेससमोर अश्लील कृत्यामुळे ‘तबलिकी समाजा’तील ६ जणांवर गुन्हा दाखल

News Desk

कोर्टाच्या निर्णयावर राष्ट्रपती ट्रम्प संतप्त 

News Desk

“मोदींनी देशाला भूक, बेरोजगारी व आत्महत्या हे तीन पर्याय दिले”, राहुल गांधी पुन्हा गरजले

News Desk